WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

मुलगा ‘रत्नागिरी उदय’ तर वडील ‘रत्नागिरी श्रीमान’ गटात उपविजेते


मुलगा ‘रत्नागिरी उदय’ तर वडील ‘रत्नागिरी श्रीमान’ गटात उपविजेते

चिपळूणच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत बाप-लेकाने जिंकली मने!

चिपळूण : ध्येय, मेहनत आणि जिद्द यांचा संगम असेल तर यश निश्चित मिळते, याचा प्रत्यय चिपळूण येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय हौशी शरीरसौष्ठव निवड चाचणी स्पर्धेत आला. वडील आणि मुलगा यांनी एकत्रितपणे स्पर्धेत सहभाग घेत उत्कृष्ट कामगिरी करत उपस्थितांची मने जिंकली.

माघी गणेश जयंतीनिमित्त शहरातील काविळतळी येथील बांदल हायस्कूल शेजारी, भैया कदम यांच्या माध्यमातून आदर्श क्रीडा आणि सामाजिक प्रबोधिनी तर्फे जिल्हास्तरीय हौशी शरीरसौष्ठव निवड चाचणी स्पर्धा उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली. या भव्य स्पर्धेत स्वामी जिम, पिंपळी खुर्द येथील रोशन सीताराम बामणे यांनी किशोर गटात प्रथम क्रमांक पटकावत “रत्नागिरी उदय किताब” मिळवून गौरवशाली यश संपादन केले. त्याचवेळी त्यांचे वडील सीताराम दत्ताराम बामणे यांनीही स्पर्धेत सहभागी होऊन प्रेरणादायी कामगिरी करत ‘रत्नागिरी श्रीमान’ गटात उपविजेतेपद पटकावले. वडील–मुलाच्या या यशस्वी जोडीने स्पर्धेला वेगळाच मान मिळवून दिला.

या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांची संद्या बामणे, रुपेश बामणे, तसेच आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक नंदकिशोर शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. स्वामी जिमचे संतोष, वेदु, सार्थक, यश, सुजल, स्वप्नील, अल्पेश, ओमी, प्रथमेश यांच्यासह सर्व सभासदांनीही त्यांचे अभिनंदन केले. विशेष म्हणजे या दोघांचीही आता राज्यस्तरावर निवड झाली असून पुढील वाटचालीसाठी सर्वत्र शुभेच्छा व्यक्त होत आहेत.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!