WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

दापोली–नारगोळी ते कणेरी मठ पायवारी उत्साहात


दापोली–नारगोळी ते कणेरी मठ पायवारी उत्साहात

दापोली : कणेरी येथील सिद्धगिरी मठ येथे महाशिवरात्री निमित्त आयोजित दापोली–नारगोळी ते कणेरी मठ पायवारी उत्साहात व भक्तिभावात पार पडली. या पायवारीत सहभागी झालेल्या सर्व गुरुबंधू व गुरुबहिनींचे मनःपूर्वक कौतुक करण्यात आले असून, विशेषतः युवापिढीचा उत्स्फूर्त सहभाग लक्षवेधी ठरला.

महाराष्ट्रातील एक प्राचीन आध्यात्मिक व सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिद्धगिरी मठात सद्गुरू परंपरा, संस्कार, सेवा आणि ग्रामीण जीवनमूल्यांचे जतन यावर भर दिला जातो. येथे विविध आध्यात्मिक उपक्रम, पदयात्रा, कृषी प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच समाजोपयोगी प्रकल्प नियमितपणे राबवले जातात.

यंदाच्या महाशिवरात्री निमित्त आयोजित पायवारीत महिला भगिनी तसेच वयोवृद्ध भक्तांची उपस्थिती विशेष उल्लेखनीय होती. सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे सर्वांनी आनंदाने व श्रद्धाभावाने सहभाग घेतला. या वारीतून प्रेरणा, दृढ श्रद्धा आणि सद्गुरूप्रती निष्ठा यांचे सुंदर दर्शन घडल्याचे आयोजकांनी सांगितले.

सहभागी भाविकांच्या सेवाभावामुळे ही पायवारी खऱ्या अर्थाने यशस्वी ठरली. सद्गुरूंचा आशीर्वाद सदैव राहो आणि पुढेही अशाच प्रकारे सेवा करण्याची संधी लाभो, अशी प्रार्थना यावेळी व्यक्त करण्यात आली.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!