WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

माझी वसुंधरा अभियानात चिपळूण पालिका अव्वल


माझी वसुंधरा अभियानात चिपळूण पालिका अव्वल

कोकणात प्रथम,  ७५ लाखाचे पारितोषिक 

चिपळूण : ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’अंतर्गत चिपळूण नगर पालिकेने कोकण विभागात गतवर्षी प्रमाणे यंदाही प्रथम क्रमांक पटकावला आहे. यामुळे चिपळूण पालिकेस ७५ लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. पालिकेने राबवलेल्या अद्यावत कचरा प्रकल्पासह विविध उपक्रमांची दखल घेतली आहे.

तत्कालीन प्रशासक तथा मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी या अभियानात विशेष योगदान दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढाम्बकर, उद्यान विभाग प्रमुख प्रसाद उर्फ बापू साडविलकर, आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते, आरोग्य निरीक्षक महेश जाधव व सुजित जाधव यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख आणि माझी वसुंधरा अभियान टीम यांनी मेहनत घेतल्याने चिपळूण पालिकेस माझी वसुंधरा अभियानात सातत्याने यश मिळत आहे. यावर्षीही अभियानातील सर्व आवश्यक निकष पूर्ण करत विविध पर्यावरणपूरक उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आले. सायकल डे, स्वच्छता, हरित उपक्रम आदी कार्यक्रम नागरिकांच्या मोठ्या सहभागामुळे विशेष लक्षवेधी ठरले. प्रशासन आणि नागरिकांच्या समन्वयातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमांमुळेच चिपळूण पालिकेने कोकण विभागात अव्वल स्थान पटकावले आहे.

पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमुळे चिपळूण पालिकेची राज्यस्तरावर सकारात्मक प्रतिमा निर्माण होत आहे. पुढील काळातही ही यशाची परंपरा कायम राहील, असा विश्वास पालिकेतील अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

या उल्लेखनीय यशाबद्दल तत्कालीन प्रशासक तथा मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी चिपळूण शहरातील सर्व नागरिक, सर्व पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांचे आभार मानले आहेत. पालिकेच्या उद्यान विभागासह सर्व विभागांचे प्रमुख, आजी-माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक, खासदार व पालकमंत्री यांचेही सहकार्याबद्दल त्यांनी मनापासून धन्यवाद व्यक्त केले आहेत. तर या कामगिरीबद्दल नगराध्यक्ष उमेश सकपाळ, उपनगराध्यक्ष रुपाली दांडेकर, विद्यमान मुख्याधिकारी संजय जाधव यांनी विशाल भोसले व अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!