खेर्डी चिंचघरी सती विद्यालयात दहावी बैठक व्यवस्था
चिपळूण -महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा( इयत्ता 10 वी) फेब्रुवारी /मार्च 2026 परीक्षेची बैठक व्यवस्था केंद्र न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज खेर्डी चिंचघरी (सती) केंद्र क्रमांक 6208 या परीक्षा केंद्रावर बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे.
या केंद्रांतर्गत एकूण 651 परीक्षार्थी प्रविष्ट होत असून, बैठक व्यवस्थाB005086 ते B005737 पर्यंत बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. या केंद्रावर मराठी, सेमी इंग्रजी, व इंग्रजी, माध्यमाचे सर्व पेपर दिनांक 20 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीमध्ये या केंद्रावर होतील. तरी या केंद्रामध्ये समाविष्ट असणाऱ्या विद्यालयातील परीक्षार्थी व पालकांनी याची नोंद घ्यावी. असे केंद्र संचालक खेर्डी चिंचघरी (सती) केंद्र क्रमांक 6208 यांनी कळवले आहे.
Views: 376










