WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

रत्नागिरी जिल्ह्यात भाजपा पक्षाची शतप्रतिशतच्या दिशेने वाटचाल


रत्नागिरी जिल्ह्यात भाजपा पक्षाची शतप्रतिशतच्या दिशेने वाटचाल

🔷 रत्नागिरीत भाजपचा उद्या जिल्हा मेळावा
🔷 प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती
🔷 दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव संघटन वाढीसाठी घेताहेत अथक मेहनत

चिपळूण : मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय मंत्री तथा माजी मुख्यमंत्री खा. नारायणराव राणे, भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, मत्स्य व्यवसाय बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी दक्षिणचे भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव दक्षिण रत्नागिरीत भाजपा संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने अथक मेहनत घेत आहेत. यामध्ये गेल्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या रत्नागिरी जिल्हा परिषद, पंचायत समिती चिपळूण व चिपळूण नगरपरिषद निवडणुकीत भाजपाला भरीव यश मिळवून देण्यात प्रशांत यादव यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. आता तर बुधवार दिनांक १७ रोजी भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण रत्नागिरी दौऱ्यावर येत असून या दौऱ्यात रत्नागिरी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह येथे रत्नागिरी उत्तर आणि दक्षिण जिल्हा पदाधिकारी बैठक व जिल्हा मेळावा तसेच पक्षप्रवेश सोहळा असे या भव्य कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. एकंदरीत, गेल्या काही महिन्यातील रत्नागिरी जिल्ह्यात भाजपा पक्षाची वाटचाल पाहता भाजप ‘शतप्रतिशत’ च्या दिशेने वाटचाल करीत आहे.

प्रशांत यादव यांच्या कुशल नेतृत्वात स्थानिक स्वराज्य निवडणुकीत भाजपाला भरीव यश

गत विधानसभा निवडणुकीत चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील नेते प्रशांत यादव यांनी करिष्मा दाखवत आपले राजकीय अस्तित्व सिद्ध केले. यानंतर भाजपात प्रवेश करीत नव्या ‘राजकीय इनिंग’ ला सुरुवात केली. आतापर्यंतची ही ‘इनिंग’ पाहता यशोमार्गावर आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्हा परिषद, चिपळूण पंचायत तर चिपळूण नगरपरिषद निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळाले. या विजयी उमेदवारांसाठी प्रशांत यादव यांनी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन नियोजनबद्ध व्युव्ह रचना आखली आणि आपला राजकीय इरादा स्पष्ट केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील प्रशांत यादव यांचे कुशल नेतृत्व, संघटन कौशल्य तथा योगदान पाहून भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी यादव यांच्यावर रत्नागिरी दक्षिण भाजपा जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली. आता तर थांबतील ते प्रशांत यादव कसे ! यादव आणि पूर्वीपेक्षा पक्ष संघटन वाढीचा वेग आणखी वाढवत जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्ष वाढीसाठी अथक मेहनत घेत आहेत.

भाजपचे रत्नागिरी जिल्ह्यावर विशेष लक्ष

लोकसभा- विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकां काही महिन्यांपूर्वी पूर्णत्वास गेल्या आहेत. आगामी या निवडणुकांसाठी बराच कालावधी असून देखील भाजपाने रत्नागिरी जिल्ह्यात संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात भाजपाने विशेष लक्ष घातले असून जिल्ह्यात महायुती म्हणून शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट ) पक्षाचे आमदार निवडून आलेले आहेत. मात्र, भाजपाचा आमदार नसल्याने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मनात शल्य आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. गत चिपळूण- संगमेश्वर विधानसभा निवडणुकीत उमेदवारी लढवलेले प्रशांत यादव यांचा भाजपा पक्ष प्रवेश झाल्यानंतर खेडमधून माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह काहींचे भाजप पक्ष प्रवेश झाले आहेत. या पक्ष प्रवेशासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मत्स्य व्यवसाय बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. विशेष म्हणजे ते रत्नागिरी जिल्ह्याचे भाजपा संपर्क मंत्री आहेत ना. राणे यांनी देखील या पदाच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यात भाजपा संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने विशेष लक्ष घातलेले आहे. माजी केंद्रीय मंत्री माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायणराव राणे यांचे देखील रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाकडे विशेष लक्ष आहे.

आ. प्रमोद जठार यांच्याकडून यादव यांचे भरभरून कौतुक

पक्षातील ज्येष्ठ नेते प्रमोद जठार यांची विधान परिषद सदस्य पदी निवड करून भाजपाने जठार यांच्यावर कोकण विभागाची जबाबदारी सोपवल्याचे दिसून येते. गेल्या महिनाभरापासून प्रमुख जठार यांनी रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा वाढवला असून रत्नागिरी जिल्ह्यात आमदार विशेष चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आमदार असला पाहिजे अशी भावना बोलून दाखवत आहेत. आपल्या भाषणातून दक्षिण रत्नागिरी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांचे नेहमीच गोड कौतुक करताना दिसत आहेत. भाजपाला रत्नागिरी जिल्ह्यात चांगला नेता मिळाल्याचे स्पष्ट करत पक्ष वाढीसाठी ते विशेष मेहनत घेत असल्याचे कौतुक करताना दिसत आहेत. यातून भाजपात रत्नागिरी जिल्ह्यात प्रशांत यादव यांचे अस्तित्व सिद्ध होताना दिसत आहे. दोनच दिवसांपूर्वी चिपळूणमध्ये प्रशांत यादव यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे आ. प्रमोद जठार यांच्या हस्ते उद्घाटन झाले या उद्घाटनप्रसंगी यादव यांचे भरभरून कौतुक केले.

प्रशांत यादव यांच्याकडून भाजप पक्षवाढीसाठी विशेष प्रयत्न

प्रशांत यादव हे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उत्तमरीत्या संघटित ठेवून पक्ष वाढीसाठी विशेष मेहनत घेत आहेत. भाजपची विचारधारा, विकासात्मक ध्येय धोरणे तर स्थानिक पातळीवर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी दक्षिणचे भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी दक्षिणमधील अन्य पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपा पक्षात प्रवेश करीत आहेत. यातून भाजपा पक्ष दिवसेंदिवस मजबूत होताना दिसत आहे. भाजपच्या दृष्टीने आनंददायी बाब आहे. तर दुसरीकडे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी यादव यांचे प्रयत्न असतात. लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत, ही यादव यांची नेहमीच भूमिका राहिली आहे. यातूनच पक्ष वाढीसाठी बळ मिळेल, असा यादव यांचा विश्वास आहे. यामुळेच प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाबद्दल भाजपा व पदाधिकारी कार्यकर्त्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

रत्नागिरीत भाजपचा उद्या जिल्हा मेळावा

आता तर भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण बुधवार दि. १७ रोजी रत्नागिरी दौऱ्यावर येत असून या दौऱ्यात रत्नागिरी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात सकाळी १० ते ११ या वेळेत रत्नागिरी उत्तर आणि दक्षिण जिल्हा पदाधिकारी बैठक, सकाळी ११ ते १२ वाजता उत्तर आणि दक्षिण पदाधिकारी कार्यकर्ता जिल्हा मेळावा, दुपारी १२ ते १.३० वाजता पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. हा दौरा यशस्वी करण्यासाठी रत्नागिरी दक्षिण भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मेहनत घेत आहेत.


596
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!