बामणोली गवळवाडीत काठीने मारहाण
एक जखमी; चौघांना धक्काबुक्की, चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
चिपळूण : तालुक्यातील बामणोली गवळवाडी येथे काठीने मारहाण केल्याची घटना घडली असून या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे १०.१५ वाजता बामणोली गवळवाडी (ता. चिपळूण) येथे घडली. या प्रकरणी दि. ६ फेब्रुवारी रोजी पहाटे ३.१४ वाजता तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत फिर्यादी प्रवीण केशव पाचकुडे (वय ४३, व्यवसाय– शेती व मजुरी, रा. बामणोली गवळवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते आपल्या घराबाहेर कुत्र्यांना खायला घालत असताना समोर रस्त्याच्या पलीकडे उभा असलेला रवि तांबे (रा. बामणोली तांबेवाडी) याने “माझे नाव कसे घेतलेस” असे म्हणत अचानक काठीने मारहाण केली.
भांडण सोडविण्यासाठी आलेले मनोज पांडुरंग पाचकुडे, प्राजक्ता प्रवीण पाचकुडे, रेणुका मनोज पाचकुडे व कांचन कृष्णा कोटकर यांनाही रवी तांबे धक्काबुक्की केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या घटनेत फिर्यादी प्रवीण पाचकुडे हे जखमी झाले आहेत.
या प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर ३७/२०२६ अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ११८(१) प्रमाणे चिपळूण पोलीस ठाण्यात रवी तांबे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.











