WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

कोकणवासीयांसाठी विशेष रेल्वे गाड्या


कोकणवासीयांसाठी विशेष रेल्वे गाड्या

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी येणाऱ्या मतदारांना दिलासा

चिपळूण : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या निमित्ताने गावी आलेल्या कोकणवासीयांच्या परतीच्या प्रवासासाठी भारतीय रेल्वेने चिपळूण–पनवेल–रत्नागिरी मार्गावर अनारक्षित विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे व उपनगर परिसरात परतणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

रविवार, दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी ०११५८ चिपळूण–पनवेल विशेष गाडी दुपारी ३:२५ वाजता चिपळूणहून सुटून रात्री ८:१५ वाजता पनवेल येथे पोहोचणार आहे. ही गाडी अनारक्षित असून सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपलब्ध असणार आहे.

या गाडीचे प्रमुख थांबे पुढीलप्रमाणे–
अंजनी, खेड, कळंबणी बुद्रुक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामने, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, पेण व आपटा.

त्याचप्रमाणे, परतीसाठी ०११५७ पनवेल–रत्नागिरी विशेष गाडी रविवार, दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ८:२५ वाजता पनवेलहून सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता रत्नागिरी येथे पोहोचणार आहे.

या गाडीचे थांबे पुढीलप्रमाणे –
आपटा, पेण, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामने, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड, अंजनी, चिपळूण, सावर्डा, आरवली, अक्षय महापदा व संगमेश्वर रोड.

या विशेष गाड्यांमुळे निवडणुकीसाठी गावी आलेल्या चाकरमान्यांना सुरक्षित व सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार असून खासगी वाहनांवरील ताणही कमी होण्याची शक्यता आहे.

या गाड्यांच्या सविस्तर वेळापत्रकासाठी प्रवाशांनी
👉 www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा
👉 RailOne अथवा NTES मोबाईल अॅप डाउनलोड करून अधिकृत माहिती घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. इतर अनधिकृत अॅपवर दिल्या जाणाऱ्या माहितीस रेल्वेची अधिकृत शाश्वती नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.


614
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!