WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

‘डीबीजे’चे निवृत्त रजिस्ट्रार अरुण शहाणे यांचे निधन


‘डीबीजे’चे निवृत्त रजिस्ट्रार अरुण शहाणे यांचे निधन

चिपळूण : नवकोकण एज्युकेशन सोसायटी संचलित डीबीजे महाविद्यालयचे निवृत्त रजिस्ट्रार अरुण अनंत शहाणे यांचे अल्पशा आजाराने आज शनिवारी सायंकाळी ४.३० वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

शहाणे यांनी दीर्घकाळ डीबीजे महाविद्यालयात रजिस्ट्रार म्हणून कार्य करताना प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांप्रती जिव्हाळा जपला. त्यांच्या कार्यकाळात महाविद्यालयाच्या प्रशासकीय कामकाजात अनेक सकारात्मक बदल घडून आले होते. सहकारी प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांमध्ये ते आदराचे स्थान राखून होते. त्यांचा स्वभाव अतिशय प्रेमळ, मनमिळाऊ होता. त्यांच्या निधनाबद्दल नवकोकण एज्युकेशन सोसायटी, डीबीजे महाविद्यालयातर्फे शोक व्यक्त करण्यात आला.

त्यांची अंत्ययात्रा शनिवारी रात्रौ ८ वाजता माऊली, परशुराम नगर, चिपळूण येथील निवासस्थानातून निघून शहरातील रामतीर्थ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!