WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

रस्ता विचारला अन् मोबाईल हिसकावून पोबारा


रस्ता विचारला अन् मोबाईल हिसकावून पोबारा

पोफळी व शिरगावात तिघां चोरट्यांची दहशत

शिरगांव : अलोरे-शिरगाव पोलीस ठाणे हद्दीत गुरुवार, दि. २१ मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मोबाईल हिसकावण्याच्या दोन घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काळ्या रंगाच्या युनिकॉर्न दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात इसमांनी रस्ता विचारण्याच्या बहाण्याने दोघांना मारहाण करून त्यांचे मोबाईल हिसकावून पळ काढला.

पहिली घटना पोफळी येथील पवारवाडी परिसरात घडली. येथे एका इसमाला चिपळूणला जाण्याचा रस्ता विचारत संशयितांनी त्याच्याशी संवाद साधला. त्यानंतर अचानक त्याला हाताने मारहाण करून त्याचा मोबाईल हिसकावून तिघेही दुचाकीवरून पसार झाले.

यानंतर काही वेळातच शिरगाव येथील दत्त मंदिर परिसरात दुसरी घटना घडली. एक महिला देवदर्शनासाठी पायी जात असताना तिला देखील चिपळूणकडे जाणारा रस्ता विचारण्यात आला. बोलता बोलता संशयितांनी तिच्या तोंडावर फटका मारून हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला आणि घटनास्थळावरून पळ काढला.

या दोन्ही घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तिन्ही संशयित हे काळ्या रंगाच्या युनिकॉर्न दुचाकीवरून फिरत होते. दुचाकीच्या डाव्या बाजूला पांढऱ्या रंगाची प्लास्टिकची पिशवी बांधलेली होती.

संशयितांचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे :
गाडी चालवणारा इसम सावळ्या रंगाचा, जाड शरीरयष्टीचा असून त्याने पांढरा शर्ट परिधान केला होता. त्याचे वय अंदाजे २० ते २५ वर्षे आहे.

मधोमध बसलेला इसम सडपातळ शरीरयष्टीचा, सावळ्या रंगाचा असून त्यानेही पांढरा शर्ट घातला होता. त्याचे वय अंदाजे २० ते २५ वर्षे आहे.

शेवटी बसलेला इसम सावळ्या रंगाचा, जाड शरीरयष्टीचा असून त्याने पांढरा शर्ट परिधान केला होता. त्याचे वय अंदाजे २० ते २५ वर्षे असल्याचे सांगण्यात आले.

संबंधित तिघांबाबत कोणाला माहिती मिळाल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!