प्रतीक्षा संपली : उद्या दहावीचा निकाल
पुणे/ मुंबई : राज्यातील महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या शुक्रवारी जाहीर केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. शुक्रवार दिनांक 8 मे 2026 रोजी दुपारी 1.00 वाजता निकाल ऑनलाईन पद्धतीनं जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत निकाल जाहीर करण्यापूर्वी सकाळी अकरा वाजता पत्रकार परिषद देखील घेतली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष आता उद्याच्या निकालाकडे लागले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेचा निकाल उद्या जाहीर केला जाणार आहे.
दहावीचा निकाल कुठे पाहाल?
https://results.digilocker.gov.in
https://www.mahresult.nic.in
https://sscresult.mkcl.org
https://mahahsscboard.in
निकाल कसा पाहायचा?
1. वरीलपैकी कोणत्याही अधिकृत वेबसाईटवर जा.
2. ‘SSC Examination Results 2026’ लिंकवर क्लिक करा.
3. तुमचा रोल नंबर (Seat No.) आणि आईचे नाव प्रविष्ट करा.
4. ‘View Result’ वर क्लिक करा आणि निकाल तपासा.
इतर सुविधाः विद्यार्थी DigiLocker अॅपवरूनही डिजिटल मार्कशीट मिळवू शकतात.











