WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

‘आयपीएल’चा आजपासून थरार


‘आयपीएल’चा आजपासून थरार

उद्घाटन सामन्यात आरसीबी विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद भिडणार

बंगळुरू : बहुचर्चित इंडियन प्रीमियर लीग (IPL) चा १९ वा हंगाम आज (शनिवार) पासून सुरू होत असून, पहिल्याच सामन्यात गतविजेते रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रंगतदार लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना बंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर सायंकाळी ७.३० वाजता सुरू होणार आहे.

उद्घाटन सोहळा रद्द; पीडितांना श्रद्धांजली

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) यंदाचा उद्घाटन सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. गतवर्षी 4 जून रोजी आरसीबीच्या विजयोत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

आरसीबी, सनरायझर्स हैदराबाद टीम सज्ज

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने मागील हंगामात विजेतेपद पटकावले होते. यंदाही संघ मजबूत दिसत असून कर्णधार रजत पाटीदार यांच्या नेतृत्वाखाली संघ मैदानात उतरणार आहे. संघात फिल सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), जेकव वेथेल, टीम डेव्हिड, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जेकब डफी, रसिक दार. इम्पॅक्ट खेळाडू व्यंकटेश अय्यर / सुयश शर्मा यांचा समावेश आहे.

सनरायझर्स हैदराबाद संघ देखील संतुलित दिसत असून कर्णधार इशान किशन यांच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. संघात ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन (कर्णधार/विकेटपर), हेरिक क्लासेन, लेम लिव्हिंगस्टोन, नितीश कुमार रेड्डी, अनिकेत वर्मा, हर्ष दुबे, जयदेव उनाडकट, हर्षल पटेल, जीशान अन्सारी इम्पॅक्ट – कामिंदू इंडिस /शिवम मावी यांचा समावेश आहे.

पहिल्या सामन्यातच रंगणार चुरस

दोन्ही संघांमध्ये आक्रमक फलंदाजी आणि अनुभवी गोलंदाजीचा समतोल असल्याने पहिल्याच सामन्यात तगडी चुरस पाहायला मिळणार आहे. विशेषतः विराट कोहली आणि ट्रॅव्हिस हेड यांची फलंदाजी प्रेक्षकांसाठी आकर्षण ठरणार आहे.

आयपीएल २०२६ कडे लक्ष

यंदाच्या हंगामात एकूण १० संघ सहभागी होत असून, अंतिम सामन्यापर्यंत प्रेक्षकांना रोमांचक सामने पाहायला मिळणार आहेत. प्रत्येक संघाने आपली सर्वोत्तम रणनीती आखली असून, पहिल्याच सामन्यापासून स्पर्धा रंगणार आहे.

एकंदरीत, आयपीएल १९ व्या हंगामाची सुरुवात दमदार होणार असून क्रिकेट चाहत्यांसाठी हा हंगाम पर्वणी ठरणार आहे.


595
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!