WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

नाल्यात कोसळला कंटेनर


नाल्यात कोसळला कंटेनर

🔴 सवतसडा धबधबा परिसरात भीषण अपघात

🔴 दिशा दर्शकाला जोरदार धडक

🔴 चालक गंभीर जखमी

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सवतसडा धबधबा परिसरात मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास पत्र वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा भीषण अपघात झाला. एका तीव्र वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनरने महामार्गावरील दिशा दर्शक फलकाला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर कंटेनर रस्त्यालगतच्या नाल्यात कोसळला.

या अपघातात कंटेनर चालक गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने अधिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर कंटेनर हा मुंबई-गोवा महामार्गावरून चिपळूणच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला.

अपघातानंतर कंटेनरमधील पत्रे महामार्गावर सर्वत्र विखुरली गेली होती. तसेच दिशा दर्शकाचा खांब कोसळल्यामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले.

घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी चालकाला रुग्णालयात पाठवले तसेच निर्माण झालेली वाहतूक कोंडी सुरळीत केली. काही वेळानंतर महामार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली.


612
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!