WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

दलवाई हायस्कूल येथे ‘खनिजांच्या विश्वात’प्रदर्शन


दलवाई हायस्कूल येथे ‘खनिजांच्या विश्वात’प्रदर्शन

मिरजोळी : दलवाई हायस्कूल, मिरजोळी येथे भूगोल दिनाचे औचित्य साधून नुकतेच ‘खनिजांच्या विश्वात’ या संकल्पनेवर आधारित भव्य खनिज प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम शैक्षणिक व ज्ञानवर्धक ठरला.


या प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. योगेश कुलकर्णी (डिपार्टमेंट ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग, इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) यांच्या हस्ते पार पडले. यावेळी श्री. राहुल केळकर सर यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमास स्कूल कमिटीचे चेअरमन मा. श्री. खालीद दलवाई, प्रशालेचे मुख्याध्यापक मा. श्री. रोहित जाधव, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. मयुरी तटकरे यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. मृणाली जाधव यांनी केले.

या उपक्रमाचे नियोजन भूगोल विषयाच्या शिक्षिका सौ. संध्या बोराटे यांनी केले. तसेच सौ. मृणाली जाधव, श्री. सुभाष मते व श्री. भैय्या पाटील यांनी प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमात डॉ. योगेश कुलकर्णी यांनी प्रोजेक्टरच्या सहाय्याने पृथ्वीची निर्मिती, खडकांची रचना, खनिजांचा उगम व इतिहास याविषयी विद्यार्थ्यांना सोप्या व रंजक पद्धतीने मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांच्या वैयक्तिक संग्रहातील ४० हून अधिक खनिजे व दगडांचे प्रत्यक्ष नमुने विद्यार्थ्यांच्या निरीक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आले.

या वेळी डॉ. कुलकर्णी व श्री. राहुल केळकर यांनी विविध खनिजांची वैशिष्ट्ये, ती सापडणारे प्रदेश तसेच दैनंदिन जीवनातील त्यांचे उपयोग याविषयी सखोल माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या खडकांचे गुणधर्मही समजावून सांगितले.

या खनिज प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात मोलाची भर पडली. परिसरात आढळणाऱ्या खडकांमधील खनिजांबाबत विद्यार्थ्यांची उत्सुकता वाढली. निसर्ग व भूगोल विषयाबद्दल गोडी निर्माण होऊन वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यास या उपक्रमाने मोठी चालना दिली, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!