WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

वाढीव वीज बिले कमी न केल्यास महावितरणवर मोर्चा – युवक तालुकाध्यक्ष निलेश कदम


 

वाढीव वीज बिले कमी न केल्यास महावितरणवर मोर्चा 

राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुकाध्यक्ष निलेश कदम यांचा इशारा

चिपळूण – तालुक्यातील अलोरे शिरगाव पंचक्रोशीतील महावितरणच्या ग्राहकांना जवळपास दुपटीने वीजबिले आली आहेत. महावितरणने रीडिंग करिता नेमलेल्या एजन्सीने काम न केल्याचा फटका ग्राहकांना बसला. वाढीव बिले कमी करावीत, अन्यथा महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस युवक चे तालुकाध्यक्ष निलेश कदम यांनी दिला आहे.
वाढीव वीज बिलावरून युवक तालुकाध्यक्ष निलेश कदम व पदाधिकाऱ्यांनी महावितरण कार्यालयावर धडक दिली. यावेळी कदम म्हणाले एप्रिल महिन्यात ग्राहकांना सरासरी बिल देण्यात आले. मात्र चालू महिन्यात ग्राहकांना दुपटीहून अधिकची बिले देण्यात आली आहेत. अलोरे, कोळकेवाडी, पेढांबे, नागावे, कुंभार्ली, पोफळी, शिरगाव तळसर मुंढे आधी भागात ग्राहकांना वाढीव दराने वीज बिल देण्यात आले. नेमणूक केलेल्या एजन्सीने काम न केल्याने ही घटना घडली. सातशे ते हजार रुपये विज बिल येणाऱ्या ग्राहकांना 5000, सात हजार. दहा हजार अशी जादा बिले आली आहेत. शंभर युनिट पेक्षा जास्त विजेचा वापर केल्यास प्रती नीट सुमारे 18 रुपये दराने वीज आकारणी केली जाते. या महिन्यात बहुतांशी ग्राहकांनी शंभर पेक्षा जास्त युनिट वीज वापर केल्याचे दाखवण्यात आले आहे. प्रत्यक्षात वीज मीटरचे रीडिंग न घेताच बिले देण्यात आली.
रीडिंग घेण्यासाठी महावितरण एजन्सीची नेमणूक करते. मात्र त्यांच्या गलथान कारभाराच्या फटका ग्राहकांना बसला आहे. या भागातील ग्राहकांना महावितरणची वीजबिले देखील वेळेत मिळत नाहीत. वारंवार अधिकाऱ्यांकडे अधिकाऱ्यांना सूचना करून देखील याकडे लक्ष दिले जात नाही. सध्या सातत्याने महागाई वाढत असून त्यातच महावितरणने वाढीव बिलाच्या शॉक दिल्याने ग्रामस्थांना संताप अनावर झाला आहे. सदरची वाढीव दिले रद्द करून नियमानुसार वीज आकारणी करावी, अन्यथा महावितरण कार्यालयावर मोर्चा काढू असा इशारा निलेश कदम यांनी दिला आहे.या वेळी सोबत सामाजिक कार्यकर्ते  रविंद्र भुवड, राजेश चव्हाण, राजेंद्र देवरुखकर , महेश शिंदे , रमेश बंगाल आदी ग्रामस्थ उपस्थित होते.


595
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!