राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, जिल्हाध्यक्षपदी उमेश गिज्जेवार बिनविरोध
चिपळूण – राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्य रत्नागिरी येथील शाखा कार्यालयामध्ये शनिवारी 16 रोजी रूपेंद्र शिवलकर, विभागीय संघटक यांचे अध्यक्षतेखाली कार्यकारिणीची सर्वसाधारण सभा झाली. या सभेत खेड प्रांत कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी उमेश गिज्जेवार
यांची संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
या सभेला रत्नागिरी जिल्ह्यातील विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. सदर सभेमध्ये संघटनेचे सरचिटणीस चंद्रकांत चौगुले यांनी जिल्हा अध्यक्ष पदाचे निवडीबाबत प्रस्ताव सादर केला. महसूल कर्मचारी संघटना पदाधिकारी रोशन कांबळे, यांनी उमेश गिज्जेवार यांना जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करणेबाबत अनुमोदन दिले. उपस्थित सर्वांनी त्यांचा प्रस्तावास बिनविरोध मान्यता दिली. त्यानुसार उमेश गिज्जेवार यांची राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्य रत्नागिरी जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करणेत आली. या निवडीसाठी ज्येष्ठ नेते रूपेंद्र शिवलकर, विभागीय संघटक, सुनील कीर, जिल्हाध्यक्ष रत्नागिरी जिल्हा महसूल कर्मचारी संघटना तसेच प्रकाश सावंत ज्येष्ठ मार्गदर्शक तथा उपाध्यक्ष रत्नागिरी जिल्हा महसूल कर्मचारी संघटना व संदीप सावंत ज्येष्ठ मार्गदर्शक तथा नायब तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. सदर सर्वसाधारण सभेला अरुण जाधव, उमेश राजेशिर्के, राघोजी नाईक, नितीन जाधव, सतीश जाधव, राधेश्याम गंधारे, रत्नदीप पवार यांनी उपस्थित राहून सभेचे कामकाज केले. उमेश गिज्जेवार यांनी जिल्हाध्यक्ष पदी निवड होताच संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील राज्य सरकारी व निम सरकारी कर्मचारी यांचे मागण्या व अडीअडचणीमध्ये राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना रत्नागिरी नेहमी अग्रेसर राहणार असलेबाबत आश्वस्त केले. सर्व कार्यकारणीसह रत्नागिरी जिल्ह्यातील विविध शाखा व संघटनेचे भेटी घेऊन संघटन मजबूत करण्याचा मनोदय व्यक्त केला.












