WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

अनारी येथे १ फेब्रुवारी रोजी वरदानदेवीचा त्रैवार्षिक महोत्सव


अनारी येथे १ फेब्रुवारी रोजी वरदानदेवीचा त्रैवार्षिक महोत्सव

अनारी (चिपळूण) : येथील अनारी गावातील श्री क्षेत्र वरदान मंदिर (वरदानवाडी) येथे वरदानदेवीचा त्रैवार्षिक महोत्सव येत्या १ फेब्रुवारी २०२६ रोजी मोठ्या भक्तिभावाने संपन्न होणार आहे. या निमित्ताने अनारी गावातील गुरव समाजाच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

चिपळूण तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून वरदानदेवीची ख्याती असून दर तीन वर्षांनी निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या या पवित्र स्थळी हा महोत्सव आयोजित केला जातो. यंदाही हा महोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे.

महोत्सवाच्या दिवशी सकाळी देवीला अभिषेक, सायंकाळी श्री सत्यनारायणाची महापूजा, हरिपाठ तसेच त्यानंतर रात्री श्री. शैलेश महाराज आंब्रे (शेल्डी) यांचे सुश्राव्य कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. महाप्रसादानंतर रात्री ११ नंतर हौशी कलाकार मंडळ, गोळवली (संगमेश्वर) यांच्या नमनाचा करमणुकीचा कार्यक्रम होणार आहे.

तसेच महोत्सवाच्या पूर्वसंध्येला, ३१ जानेवारी २०२६ रोजी पंचक्रोशी पातळीवर नाईट अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवाला विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार असून अनारी गावातील गुरव समाजाने महोत्सवाची जय्यत तयारी केली आहे. तरी या त्रैवार्षिक महोत्सवाला सर्व भाविकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन गुरव समाज व समस्त ग्रामस्थांनी केले आहे.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!