WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

काविळतळी ओपन जिम परिसरातील झाडांना मिळाले जीवनदान!


काविळतळी ओपन जिम परिसरातील झाडांना मिळाले जीवनदान!

पाण्याची तातडीने व्यवस्था, युवासेना शहर प्रमुख विनोद पिल्ले यांचा पुढाकार

चिपळूण : शहरातील प्रभाग क्रमांक ८ मधील काविळतळी येथे नगर पालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या ओपन जिम परिसरात सुशोभीकरणासाठी लावण्यात आलेली फुलझाडे पावसाळा संपल्यानंतर पाण्याअभावी सुकण्याच्या मार्गावर होती. याबाबत स्थानिक नागरिकांनी चिंता व्यक्त करत उपाययोजना करण्याची मागणी केली होती.

या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी युवासेना शहर प्रमुख विनोद पिल्ले यांच्याकडे धाव घेतली. पिल्ले यांनी तत्काळ या बाबीची दखल घेत चिपळूणचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ तसेच नगरसेवक व पाणी समिती सभापती निहार कोवळे यांना परिस्थितीची माहिती दिली. झाडे टिकवण्यासाठी त्या ठिकाणी पाण्याच्या नळाची व्यवस्था करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. याची तातडीने दखल घेत नगराध्यक्ष सकपाळ आणि पाणी सभापती कोवळे यांनी नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना संबंधित ठिकाणी पाठवून पाण्याच्या नळाची व्यवस्था करून घेतली. त्यामुळे आता ओपन जिम परिसरातील झाडांना नियमित पाणी मिळणार असून परिसराचे सौंदर्य टिकून राहण्यास मदत होणार आहे.

या जलद आणि सकारात्मक कारवाईबद्दल स्थानिक नागरिकांनी नगराध्यक्ष उमेश सकपाळ, पाणी सभापती निहार कोवळे, युवासेना शहर प्रमुख विनोद पिल्ले यांचे आभार व्यक्त केले आहेत. नागरिकांच्या समस्यांकडे तत्परतेने लक्ष देत त्यावर उपाययोजना केल्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.


595
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!