WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

गुहागर विधानसभा मतदारसंघात अडीच हजार झाडे लावणार


गुहागर विधानसभा मतदारसंघात अडीच हजार झाडे लावणार

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त उपक्रम

चिपळूण : शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 6 जून रोजी गुहागर विधानसभा मतदारसंघात प्रत्येक गावात दहा झाडे अशी एकूण अडीच हजार झाडे लावण्याचा संकल्प शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य श्री. विक्रांत जाधव यांनी केला आहे. 6 जून रोजी श्री. विक्रांत जाधव यांचा वाढदिवस देखील असतो.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत त्यामध्ये ‘वृक्ष लावा दारोदारी समृद्धी येईल घरोघरी’ हे ब्रीदवाक्य घेऊन गुहागर विधानसभा मतदारसंघात गावागावात वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

उन्हाळ्यात कोकणात तापमानाचा पारा 42 अंश सेल्सिअसच्या घरात पोहोचला होता त्यामुळे पर्यावरण समतोल राखण्यासाठी आता प्रत्येकाने वृक्ष लागवड करून पर्यावरण संवर्धनाचे कार्य करणे आवश्यक आहे. या उद्देशाने हा उपक्रम जिल्हाप्रमुख श्री. विक्रांत जाधव यांनी हाती घेतला आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी गुहागर मतदारसंघातील पक्षाचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक प्रयत्नशील आहेत.


595
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!