WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

आधीच ‘गॅस’चा तुटवडा त्यात चोरांचा डल्ला!


आधीच ‘गॅस’चा तुटवडा त्यात चोरांचा डल्ला!

लांज्यात हातगाडी व्यवसायिक अडचणीत

लांजा : शहरातील बाजारपेठ परिसरात गॅस सिलिंडर चोरीची धक्कादायक घटना समोर आली असून, शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोन हातगाडी व्यवसायिकांच्या गाड्यांवरून गॅस सिलिंडर अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे रविवारी सकाळी उघडकीस आले. आधीच गॅस सिलिंडरची टंचाई जाणवत असताना घडलेल्या या चोरीमुळे परिसरात आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जात आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, लांजा बाजारपेठेतील दोन हातगाडी व्यवसायिकांच्या गाड्यांवर ठेवलेले गॅस सिलिंडर अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या वेळी चोरून नेले. यामध्ये एका व्यवसायिकाची हातगाडी भूमी अभिलेख कार्यालयासमोर उभी असते, तर दुसऱ्या व्यवसायिकाची हातगाडी साई लॉजसमोर असते.

रविवारी सकाळी संबंधित व्यवसायिक आपल्या हातगाडीकडे आले असता गॅस सिलिंडर गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला. सध्या गॅस सिलिंडरचा तुटवडा भासत असतानाच ही चोरी झाल्याने संबंधित व्यवसायिकांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे.
या घटनेमुळे लांजा शहरातील इतर हातगाडी व्यवसायिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रात्रीच्या वेळी बाजारपेठ परिसरात सुरक्षा वाढवण्याची मागणी केली जात आहे.

दरम्यान, आधीच सिलिंडर टंचाई असताना चोरट्यांनी थेट गॅस सिलिंडरवर डल्ला मारल्याने “चोरांचा मोर्चा आता गॅस सिलिंडरकडे वळला का?” अशी चर्चा संपूर्ण लांजा शहरात रंगली आहे.

 

 


595
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!