WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

इतिहासातील पहिलेच ‘फॉरेन रिटर्न नमन’ चिपळुणात!


इतिहासातील पहिलेच ‘फॉरेन रिटर्न नमन’ चिपळुणात!

गुढीपाडव्याच्या निमित्ताने विनामूल्य खास शो

चिपळूण : कोकणातील पारंपरिक लोककला जपण्यासाठी वाशिष्ठी डेअरीच्या वतीने गुढीपाडव्याच्या निमित्ताने खास ‘फॉरेन रिटर्न नमन’ या लोकनाट्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम गुरुवार, दिनांक १९ मार्च २०२६ रोजी रात्री ९ वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण येथे रंगणार आहे.

कोकणातील पारंपरिक लोकनाट्य प्रकार असलेले नमन हे आपल्या विनोदी शैली, सामाजिक संदेश आणि सांस्कृतिक परंपरेमुळे प्रेक्षकांचे विशेष आकर्षण ठरते. या कार्यक्रमात सादर होणारे ‘फॉरेन रिटर्न नमन’ हे विशेष वैशिष्ट्यपूर्ण असून, इतिहासात प्रथमच परदेशात सादर झालेल्या कोकणातील नमन प्रकाराचा हा मानाचा कार्यक्रम असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.

या नमनाला ‘महाराष्ट्र महोत्सव २०२५’ मध्ये सर्वोत्तम नमन हा मानाचा पुरस्कार मिळालेला आहे. त्यामुळे चिपळूण आणि परिसरातील रसिकांना उत्कृष्ट लोककलेचा अनुभव घेण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे.

या कार्यक्रमाला प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला असून, गुढीपाडव्याच्या उत्सवी वातावरणात कोकणातील समृद्ध लोककलेचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन, प्रसिद्ध उद्योजक प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक आणि चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांनी केले आहे.

 

 


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!