WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

रत्नागिरी जिल्हा निरीक्षकपदी विजय देसाई यांची निवड


रत्नागिरी जिल्हा निरीक्षकपदी विजय देसाई यांची निवड

नियुक्तीमुळे पक्षाला नवचैतन्य मिळणार : मुराद अडरेकर

रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) संघटना अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने रत्नागिरी जिल्हा निरीक्षकपदी पाली (रत्नागिरी) येथील विजय देसाई यांची निवड करण्यात आली आहे.

विजय देसाई हे गेली अनेक वर्षे मुंबई येथे पक्ष संघटनेत सक्रियपणे कार्यरत असून संघटनात्मक कामाचा मोठा अनुभव असलेले कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार तसेच प्रांताध्यक्ष शशिकांत शिंदे यांचे ते अत्यंत विश्वासू कार्यकर्ते म्हणूनही त्यांची ओळख आहे.

त्यांच्या या नियुक्तीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील पक्ष संघटनेत नवचैतन्य निर्माण होईल तसेच कार्यकर्त्यांना योग्य मार्गदर्शन मिळून पक्ष अधिक सक्षमपणे उभा राहण्यास मदत होईल, असे मत तालुकाध्यक्ष मुरादभाई अडरेकर यांनी व्यक्त केले आहे.

विजय देसाई यांच्या माध्यमातून जिल्ह्यात पक्षविस्तार, संघटन मजबुती व कार्यकर्त्यांमध्ये नव्या उत्साहाने काम सुरू होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यांच्या निवडीबद्दल पक्षाच्या विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

 

 


612
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!