WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

घरडा कॉलेजच्या संदीप फेपडे यांना राज्यस्तरीय पुरस्कार


घरडा कॉलेजच्या संदीप फेपडे यांना राज्यस्तरीय पुरस्कार

खेड : तालुक्यातील नजीकच्या घरडा फाउंडेशन संचलित घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयातील कर्मचारी व संगमेश्वर तालुक्यातील कोसुंबचे सुपुत्र संदीप फेपडे यांना नुकताच पुणे येथील शिव प्रतिष्ठान संस्थेतर्फे सामाजिक व शैक्षणिक योगदानाकरिता “समाज भूषण” या पुरस्काराने गौरविण्यात आले.

तालुक्यातील घरडा फाउंडेशन या संस्थे मार्फत व घरडा इन्स्टीटयूट ऑफ टेक्ननाॅजी या अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यरत असणारे संदीप फेपडे हे गेली ३० वर्षे संस्थां मार्फत सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. यामध्ये शेती विकास, सामाजिक विकासात्मक कार्य, आरोग्य जाणीव जागृती, शैक्षणिक उपक्रम यामध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे. या सामाजिक व शैक्षणिक कामाची दखल घेऊन पूणे येथील शिव प्रतिष्ठान सामाजिक संस्था यांनी आळंदी येथे संदीप फेपडे यांचा समाज भूषण या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासमयी शिक्षणसम्राट श्री. रामकिशनजी रवंदळे, राष्ट्रपती पुरस्कार विजेते श्री. रामचंद्र आवटे, शिव प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष श्री. मदनजी रेनगडे यांचेसह महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवर व पुरस्कार विजेते आणि संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते. यामुळे घरडा महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील , सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंदाकडून फेकडे यांचे अभिनंदन केले गेले.


595
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!