WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

रोहिणी ओतारी यांना पीएचडी


 रोहिणी ओतारी यांना पीएचडी

शिक्षण, संशोधन आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श

चिपळूण : शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता, नवोन्मेष आणि संशोधनाचा ठसा उमटवणाऱ्या आकार एज्युकेशनल ट्रस्टच्या चेअरमन तसेच ए.एच.ए. कॉलेज ऑफ होटल मॅनेजमेंटच्या प्राचार्या सौ. रोहिणी दीपक ओतारी यांनी मुंबई विद्यापीठाच्या बिझनेस पॉलिसी अ‍ॅण्ड अ‍ॅडमिनिस्ट्रेशन विभागातून डॉक्टरेट (Ph.D.) पदवी प्राप्त केली आहे. या उल्लेखनीय शैक्षणिक यशामुळे त्यांच्या कार्यक्षेत्रात आणखी एक मानाचा शिखरस्पर्श झाला आहे.

प्रिन्सिपल ऑफ पिल्ले कॉलेज अँड आर्ट्स-कॉमर्स- सायन्स पनवेल, डॉक्टर सी. ए. गजानन व रिसर्च गाईड डॉक्टर प्रेम भगवान आचार्य

डॉ. रोहिणी ओतारी यांचा संशोधन विषय “An Analysis of Perception and Awareness Towards Financial Planning and Wealth Management Among Employees” असा होता. या अभ्यासासाठी त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील ३० कंपन्यांमधील ४८५ कर्मचाऱ्यांवर सखोल संशोधन केले. सुमारे तीन वर्षे सात महिने चाललेल्या या संशोधनातून कर्मचाऱ्यांची आर्थिक नियोजनाबाबतची जाणीव, समज आणि प्रत्यक्ष व्यवहारातील वास्तव अधोरेखित करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे हे संशोधन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाले असून डॉ. ओतारी यांनी आजपर्यंत १६ राष्ट्रीय व ९ आंतरराष्ट्रीय संशोधन निबंध (Research Papers) प्रकाशित केले आहेत. त्यांच्या या संशोधन कार्यामुळे शिक्षण आणि वित्तीय व्यवस्थापन क्षेत्राला मोलाची दिशा मिळाली आहे.

गुरु द्रोणाचार्य पुरस्कार, आयकॉनिक रोल मॉडेल एज्युकेशन नॅशनल अचिव्हर्स अवॉर्ड, भारतभूषण राष्ट्रीय पुरस्कार यांसारख्या अनेक मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या डॉ. रोहिणी ओतारी यांचा हा शैक्षणिक प्रवास केवळ वैयक्तिक यशापुरता मर्यादित न राहता समाजासाठी दिशादर्शक ठरत आहे.

या यशाबद्दल पिल्ले कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स, पनवेलचे प्राचार्य डॉ. सी. ए. गजानन तसेच संशोधन मार्गदर्शक डॉ. प्रेम भगवान आचार्य यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. त्यांच्या या यशाबद्दल विविध माध्यमांतून कौतुक होत असून अखिल भारतीय ओतरी समाज, कोकण-ठाणे समाज बांधव आणि चिपळूण ओतरी समाज यांच्याकडून विशेष अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

“अजून मला काहीतरी शिकायचं आहे” ही प्रबळ जिद्द बाळगून सतत ज्ञानसाधनेत रमणाऱ्या डॉ. रोहिणी दीपक ओतारी आज नव्या पिढीसाठी प्रेरणास्थान ठरत असून शिक्षण, संशोधन आणि सामाजिक बांधिलकी यांचा समतोल साधणारा त्यांचा प्रवास निश्चितच अनुकरणीय आहे.


612
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!