WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

विद्यार्थ्यांनी रंगरेषांमधून साकारले महात्मा गांधीजी


विद्यार्थ्यांनी रंगरेषांमधून साकारले महात्मा गांधीजी!

गांधीघाट-गांधारेश्वर परिसर येथील चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

चिपळूणः येथील पूज्य गांधी प्रतिष्ठान, गांधी विचारांचा प्रसार करण्यासाठी कार्यक्रम राबवत असते. त्या अंतर्गत १२ फेब्रुवारी रोजी राष्ट्रपिता म.गांधी समाधी स्थापना दिना निमित्त प्राथमिक इयत्ता ५ वी ते ७ वी व माध्यमिक इयत्ता ८ वी ते १० या दोन गटात चित्रकला स्पर्घा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचे विषय प्राथमिक गटासाठी “गांधीजी व चरखा” तर माध्यमिक गटासाठी “दांडीयात्रा” हे होते. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत दलितमित्र तात्यासाहेब कोवळे यांच्या स्मृतिपित्यर्थ आयोजित स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद होता. रंगरेषांच्या आधारे गांधीजीवन चित्र साकारणाऱ्या विद्यार्थ्यांनी परिसर फुलून गेला. विद्यार्थ्यांचे अत्यंत तन्मयतेने चित्र रेखाटन करतानाचे दृश्य अत्यंत विलोभनीय होते. त्याला उपस्थितांकडून तितकीच दाद मिळत होती.


सौ.अमृता आशय होमकळस यांनी विविध प्रकारच्या फुलांनी समाधीचे आकर्षक सजावट केली होती. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन सौ. सई वरवाटकर यांनी केले तर आपल्या प्रास्ताविकातून कार्यक्रमाचे उद्देश प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. विनायक होमकळस यांनी स्पष्ट केले. यावेळी स्पर्धेतील विजेत्यांना प्राथमिक गट प्रथम क्रमांक श्रवण प्रकाश राडये (सती हायस्कूल) द्वितीय क्र. आर्या नितिन तावडे(दलवाई हायस्कूल)तृतीय क्र. श्रेयस संजय भोसले (कापरे प्रा.शाळा) तर उत्तेजनार्थ १) दिपीका रविंद्र गवळे ( सती हायस्कूल)२) चिन्मय प्रशांत काणेकर (परांजपे हायस्कूल) तसेच माध्यमिक गट, प्रथम क्र.अदिती अप्पासाहेब शेंगडे (सावर्डे हायस्कूल)द्वितीय क्र, दुर्वांग प्रमोद जाधव (दलवाई हायस्कूल) तृतीय क्र. स्वरा मनोज पाथरे (परांजपे हायस्कूल) व उत्तेजनार्थ १) दक्ष दिनेश गिजये ( सती हायस्कूल) २) ताहुरा वासिम पटवेगार ( महाराष्ट्र हायस्कूल) यांना श्री. बापू काणे, निवृत्त पोलिस अधिकारी श्री. कुमार कोवळे, श्री. सुरेंद्र श्रीकांत देवळेकर यांदी मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यां सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. तात्यासाहेब कोवळे याचे चिरंजीव डाँ. शेखर कोवळे यांनी बक्षिसासाठी काही रक्कम देणगी स्वरुपात दिली. स्पर्धेचे परीक्षक म्हणून कलाशिक्षक अ. र. शिगवण व कुंभार एस. ए. यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सचिव सुनिलदादा यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंगेश वेस्वीकर, लियाकत शहा, सौ.छाया व श्री. प्रशांत सातारकर, सौ. सुनिता व श्री. दीपक महाडिक, जाफर गोठे आदिनी प्रयत्न केले.


595
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!