पंडित अरविंद मुळगांवकर स्मृतिप्रित्यर्थ चिपळूणमध्ये सांगीतिक श्रद्धांजली
चिपळूण : ज्येष्ठ तबलावादक पंडित अरविंद मुळगांवकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ संगीतझरा यांच्या वतीने भव्य सांगीतिक श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार, दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजता रोहीदास भवन, मार्कंडी, चिपळूण येथे होणार आहे. या कार्यक्रमात दोन सत्रांमध्ये शास्त्रीय संगीताचा सुरेल संगम अनुभवायला मिळणार आहे.
सत्र १ मध्ये संगीतझरा तबला–ढोलकी क्लासेस, चिपळूण तसेच विद्याभारती भारतीय शिक्षण संकुल, शिरळ (चिपळूण गुरुकुल) येथील विद्यार्थ्यांचे तबला सहवादन सादर होणार असून, ढोलकी सहवादन देखील संगीतझरा क्लासेसच्या विद्यार्थ्यांकडून सादर केले जाणार आहे.
सत्र २ मध्ये पंडित अरविंद मुळगांवकर यांचे शिष्य श्री वैष्णव चव्हाण यांचे एकल तबलावादन होणार आहे. त्यानंतर शास्त्रीय गायनाची मैफल सुश्री धनश्री अभ्यंकर (विदुषी श्रुतीताई सडोलीकर–काटकर यांच्या शिष्या) सादर करणार आहेत. संवादिनीवर श्री अमित ओक आणि श्री श्रेयस जंगम साथ करणार असून, कार्यक्रमाचे निवेदन श्री मयुरेश भागवत करणार आहेत.
हा कार्यक्रम श्री. यदुवीर चोगले यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमास संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे अधिक माहितीसाठी ७५०६४४५७६० यावर संपर्क साधावा.











