WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

खेडमध्ये आमदार प्रमोद जठार यांचे जंगी स्वागत


खेडमध्ये आमदार प्रमोद जठार यांचे जंगी स्वागत

खेड : भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा कोकणातील प्रभावी नेतृत्व म्हणून ओळख असलेले प्रमोद जठार यांची महाराष्ट्र विधान परिषद सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांच्या खेड दौऱ्यानिमित्त शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे प्रमोद जठार यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत फटाक्यांची आतषबाजी केली. पुष्पगुच्छ व सत्कार करून जठार यांचे अभिनंदन करण्यात आले. त्यानंतर शासकीय विश्रामगृह (डाक बंगला, खेड) येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधला. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी तळागाळात काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी बोलताना भाजपा पदाधिकाऱ्यांनी पक्ष नेतृत्वाने कोकणाला दिलेल्या प्रतिनिधित्वाबद्दल समाधान व्यक्त केले. प्रमोद जठार यांच्या विधान परिषद निवडीमुळे कोकणातील प्रश्नांना राज्य पातळीवर अधिक प्रभावीपणे आवाज मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

कार्यक्रमास भाजपा जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, भाजपा रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, भाजपा खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, भाजपा दक्षिण तालुकाध्यक्ष विनोद चाळके, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र साळवी, भाजपाचे ज्येष्ठ नेते राजू भाई रेडीज, भाजपा अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक गटनेते रहीम भाई सहिबोल, नगरसेविका वैभवी खेडेकर, स्वप्नाली चव्हाण, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अँड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, भाजपा प्रेणित रिक्षा सेल जिल्हाध्यक्ष सिकंदर बांगी, उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस वसंत ताम्हणकर, राजेश जोयसर, राहुल पाटणे, माजी नगराध्यक्षा उर्मिला पाटणे-शेट्ये, माजी नगरसेविका आशा सनगरे, प्रीती चिखले, माया गुहागरकर, मंदार आपटे, वैजेश सागवेकर, अक्षय सनगरे, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, ओवेस चौगुले, जयेश गुहागरकर, विजय गुप्ता, प्रणव मापुस्कर, स्वराज गांधी तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!