WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

एलपीजी वितरकांचा देशव्यापी आंदोलनाचा इशारा


एलपीजी वितरकांचा देशव्यापी आंदोलनाचा इशारा

योग्य सेवा शुल्क आणि सन्मानासाठी लढा

चिपळूण – देशभरातील एलपीजी वितरकांनी “एलपीजी डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशन ऑफ इंडिया” (LDAI) यांच्या नेतृत्वाखाली आपल्या हक्कांसाठी आणि योग्य सेवा शुल्काच्या मागणीसाठी देशव्यापी आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. होम डिलिव्हरी व प्रशासकीय शुल्कात किमान ७५ रुपये तात्काळ वाढ करण्यात यावी, तसेच वितरकांना “योग्य सेवा शुल्क व सन्मान” मिळावा, अशी मागणी केली आहे.
संघटनेचे ददिलेल्या निवेदन नानुसार, वाढता वितरण खर्च, प्रशासकीय अडचणी आणि सेवाशुल्कातील असमानतेमुळे एलपीजी वितरकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. “गॅस वितरण ही अत्यंत जबाबदारीची सेवा असून त्यासाठी लागणारा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तरीही सेवाशुल्कात वाढ होत नसल्याने आमच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आम्हाला सन्मानाने जगण्याचा आणि योग्य मोबदला मिळण्याचा हक्क आहे.

आंदोलनाचे वेळापत्रक :

🔹 २९ ऑक्टोबर २०२५
सायंकाळी ७ वाजता सर्व वितरक मशाल व मोमबत्ती मोर्चा काढून शांततामय निषेध नोंदवतील.

🔹 ६ नोव्हेंबर २०२५
“नो मनी, नो इंडेंट” — या दिवशी कोणतीही रक्कम जमा केली जाणार नाही आणि इंडेंट स्वीकारले जाणार नाही.

🔹 शेवटचा टप्पा
जर शासनाने मागण्या मान्य केल्या नाहीत, तर देशभरातील सर्व एलपीजी वितरक अनिश्चितकालीन संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. हे आंदोलन पूर्णपणे शांततामय व संघटित पद्धतीने केले जाईल. “आमच्या मागण्या ग्राहकविरोधी नाहीत, तर सेवा टिकवण्यासाठी आणि सुरक्षित वितरणासाठी अत्यावश्यक आहेत,” असे संघटनेचे म्हणणे आहे.


620
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!