WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

कळंबट जि.प. गट : शिवसेना उबाठा ‘लय भारी’


कळंबट जि.प. गट : शिवसेना उबाठा ‘लय भारी’

वीर गावातील असंख्य प्रमुख, कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश

आमदार भास्करराव जाधव, जिल्हाप्रमुख विक्रांतदादा जाधव यांनी केले स्वागत

चिपळूण : गुहागर विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या चिपळूण तालुक्यातील वीर गावातील घेवडेवाडी, मोगरेवाडी, बंदरवाडी नंबर १ या तीन वाड्यांसह संपूर्ण गावातील विविध पक्षांमध्ये काम करणारे असंख्य कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी एकत्र येत शिवसेना नेते आमदार श्री. भास्करराव जाधव यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.

आम्ही इतर पक्षांमध्ये कार्यरत असताना विकासकामांसाठी आमच्या नेत्यांकडे जात होतो. पण, त्यांच्याकडून छोटी छोटी कामेसुद्धा होत नव्हती. दुसरीकडे आमदार श्री. भास्करराव जाधव यांच्या माध्यमातून गावात विकासकामांचा डोंगर उभा राहत असल्याचे आम्ही पहात आलो आहे. त्यामुळे तेच आमचा विकास करू शकतात याची खात्री आम्हाला पटली. आपण चुकीच्या मार्गाने जात आहोत ही जाणीव झाल्याने आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असे यावेळी प्रवेश केलेल्या अनेकांनी सांगितले.

प्रवेशकर्त्यांमध्ये शंकर घेवडे, धोंडू घेवडे, पांडुरंग घेवडे, यशवंत घेवडे, चंद्रकांत शिगवण, बारकू शिगवण, मंगेश विरकर, भागोजी दुर्गोळी, दीपक दुर्गोळी, भास्कर दुर्गोळी, हरिश्चंद्र दुर्गोळी, उदय जावळे, अनंत दुर्गोळी, योगेश दुर्गोळी, रामचंद्र दुर्गोळी, यशवंत गावडे, कृष्णा दुर्गोळी, हरिश्चंद्र बाचीम , सोनू दुर्गोळी, प्रमोद दुर्गोळी आदी प्रमुख मंडळींचा समावेश आहे.

शिवसेना नेते आमदार श्री. भास्करराव जाधव आणि जिल्हाप्रमुख श्री. विक्रांतदादा जाधव यांनी या सर्वांचे पक्षामध्ये स्वागत केले. तुमच्या भागाच्या विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असे सांगून आमदार श्री. जाधव यांनी या ग्रामस्थांची प्रमुख मागणी असलेल्या रस्त्यासाठी पैसे उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

यावेळी पक्षाचे तालुकाप्रमुख श्री. जितेंद्र चव्हाण, उपतालुकाप्रमुख श्री. लक्ष्मण कोकमकर, विभाग प्रमुख श्री. राजेंद्र दळवी, विभाग प्रमुख श्री. अरविंद धामणस्कर, शाखा प्रमुख श्री. विजय बेंडल, प्रमोद दुर्गोळी, संतोष सावर्डेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.


620
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!