WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

चिपळूण अर्बन बँकेच्या नव्या इमारतीचे उद्या उद्घाटन


चिपळूण अर्बन बँकेच्या नव्या इमारतीचे उद्या उद्घाटन

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भव्य वास्तुतून ग्राहकांना मिळणार सेवा

चिपळूण : विश्वास आणि आपुलकी जपणारी बँक म्हणून ओळख असलेली कोकणातील अग्रगण्य चिपळूण अर्बन बँकेच्या प्रधान कार्यालय व मुख्य शाखेच्या नव्या अत्याधुनिक इमारतीचे उद्घाटन उद्या गुरुवारी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर, दि. १९ मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजता होणार आहे. उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.

चिपळूण अर्बन बँक ही गेल्या अनेक वर्षांपासून ग्राहकांना विश्वासार्ह, सुरक्षित आणि दर्जेदार बँकिंग सेवा देत आहे. ग्राहकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन बँकेने नव्या इमारतीची उभारणी केली आहे. ही नवी वास्तू अत्याधुनिक सुविधा, प्रशस्त जागा आणि आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असून ग्राहकांना अधिक वेगवान, सोयीस्कर आणि दर्जेदार सेवा मिळणार आहे.

या उद्घाटन सोहळ्याला खासदार नारायण राणे, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रत्नागिरीचे सोपान शिंदे, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, माजी नगराध्यक्ष सुचय रेडीज, कोअर कमिटी सदस्य उमेश काटकर यांच्यासह बँकेचे अध्यक्ष मोहन मिरगल, उपाध्यक्ष धनंजय खातू, मुख्य कार्यकारी अधिकारी तुषार सूर्यवंशी, संचालिका राधिका पाथरे, निहार गुडेकर, नीलेश भुरण, रहिमान दलवाई, प्रशांत शिरगावकर, समीर जानवळकर, गौरी रेळेकर, राजेश केळस्कर, मिलींद कापडी, रत्नदीप देवळेकर, समीर टाकळे, सुनील खेडेकर, संपदा रेडीज, दिलीप दळी, विवेक रेळेकर, दिनेश रेडीज, श्रीराम देवळेकर, सतीश खेडेकर, विराज दळी, मधुसूदन माने आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, सभासद, ग्राहक, हितचिंतक, व्यावसायिक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

हा कार्यक्रम चिपळूण शहरासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. नवीन इमारतीमुळे बँकेच्या सेवांना अधिक बळ मिळणार असून, कोकणातील बँकिंग क्षेत्रात चिपळूण अर्बन बँकेची ओळख अधिक भक्कम होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. बँकेच्या प्रगतीत ग्राहकांच्या अमूल्य सहकार्याचा आणि विश्वासाचा मोठा वाटा असल्याचे नमूद करत, या नव्या इमारतीद्वारे अधिक सक्षम व आधुनिक सेवा देण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे.

तरी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष मोहन बाळ मिरगल, उपाध्यक्ष धनंजय अशोक खातू, मुख्य कार्यकारी अधिकारी तुषार सूर्यवंशी यांनी केले आहे.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!