WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

जीआयटी मध्ये उद्योग व शिक्षण संस्थांमधील दुवा विषयावर १६ रोजी परिषद


जीआयटी मध्ये उद्योग व शिक्षण संस्थांमधील दुवा विषयावर १६ रोजी परिषद

चिपळूण ः खेड तालुक्यातील लवेल येथील घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयात शुक्रवारी १६ जानेवारी रोजी HR Conclave 2026 चे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढेल, उद्योग–शिक्षणसंस्था सहकार्य अधिक बळकट होईल. दीर्घकालीन भागीदारीतून राष्ट्रनिर्मितीस हातभार लागेल, असा विश्वास परिषदेचे अध्यक्ष व प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील, शिक्षण तज्ञ डॉ. ए. बी. मराठे व संस्था प्रतिनिधी सतीश वेंगोली यांनी व्यक्त केला.

भविष्यासाठी सज्ज अभियंते घडवण्यासाठी उद्योग व शिक्षण संस्थांमधील दुवा या विषयावर परिषद होणार आहे. या परिषदेत उद्योगजगता मधील मानव संसाधन तज्ज्ञ, उद्योग प्रतिनिधी, शिक्षणतज्ज्ञ तसेच संस्थेचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

या कार्यक्रमासाठी लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. राज आंब्रे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती आहे. लोटे, महाड, पुणे, मुंबई व नागपूर येथील विविध उद्योगांचे प्रतिनिधी परिषदेत सहभाग घेणार आहेत. परिषदेत उद्योगाच्या बदलत्या अपेक्षा, भविष्यात आवश्यक कौशल्ये, शैक्षणिक अभ्यासक्रमांची उद्योगाशी सुसंगती, इंटर्नशिप, लाईव्ह प्रोजेक्ट्स व प्लेसमेंट संधी यावर सखोल चर्चा करण्यात येणार आहे. या प्रसंगी अकादमिक, उद्योग व समाज यांच्या समन्वयातून युवकांचे क्षमता-विकसन करण्याची सामूहिक व दृढ बांधिलकी व्यक्त करण्यात येणार आहे.


595
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!