WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

वणव्यांचे तांडव रोखण्यासाठी जनजागृतीचा धगधगता लढा!


वणव्यांचे तांडव रोखण्यासाठी जनजागृतीचा धगधगता लढा!

चिपळूण–खेड–गुहागर–सावर्डे परिसरातवन वणवा जनजागृती व्यापक कार्यक्रम

चिपळूण : उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वाढणाऱ्या वनवणव्याच्या भीषण संकटाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र राज्य वन विभाग, वाईल्ड लाईफ एज्युकेअर आणि अर्थ फाऊंडेशन, चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने वन वणवा जनजागृती कार्यक्रम २०२६ राबविण्यात येत आहे. रत्नागिरी वन विभाग (चिपळूण) अंतर्गत येणाऱ्या खेड, गुहागर, चिपळूण व सावर्डे वन परिक्षेत्रात ही व्यापक मोहीम राबवली जाणार आहे.

दरवर्षी निष्काळजीपणा, मानवी चूक, जाळपोळ, शेतमाल साफसफाई आदी कारणांमुळे होणारे वणवे जंगलातील जैवविविधतेसाठी घातक ठरत असून वन्यजीव, पर्यावरण व मानवी जीवनावरही त्याचा गंभीर परिणाम होत आहे. हीच गंभीरता लक्षात घेऊन ग्रामीण भागात थेट जाऊन नागरिकांना व शेतकऱ्यांना वणव्याबाबत जागरूक करण्याचा संकल्प या मोहिमेतून करण्यात आला आहे.

२७ जानेवारी ते १६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत सदर जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, दररोज सकाळी १० ते ११:३० आणि दुपारी १२ ते १:३० या वेळेत गावागावांत मार्गदर्शन केले जाणार आहे. काही ठिकाणी अतिरिक्त सत्रेही ठेवण्यात आली आहेत.
या मोहिमेदरम्यान
✔️ वणवे कसे लागतात
✔️ वणव्याचे दुष्परिणाम
✔️ वणवा रोखण्यासाठी घ्यावयाची काळजी
✔️ आग लागल्यास तात्काळ काय करावे
✔️ वन विभागाशी संपर्क कसा साधावा
याबाबत माहिती देण्यात येणार आहे. स्थानिक नागरिकांचा सहभाग, शालेय विद्यार्थी, शेतकरी, महिला बचतगट यांचा सक्रिय सहभाग वाढवण्यावर भर देण्यात येत आहे.
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी खेड वनपाल उदय भागवत, गुहागर वनपाल अमित निमकर, चिपळूण वनपाल साताप्पा सावंत व सावर्डे वनपाल सुरेश उपरे हे अधिकारी व त्यांचे सहकारी तसेच वाईल्ड लाईफ एज्युकेअर आणि अर्थ फाऊंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

जंगल वाचवा, जीवन वाचवा” हा संदेश देत ही जनजागृती मोहीम भविष्यातील वणव्यांचे धोके कमी करण्यास निश्चितच मोलाची ठरणार आहे.


612
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!