चिपळूण-कराड मार्गावर धोकादायक झाड
अपघाताचा गंभीर धोका
चिपळूण : शहरातील मार्कंडी येथील मेहता पंपासमोर एक झाड पूर्णपणे सुकले असून ते रस्त्याकडे कलंडले आहे. हे झाड कधीही कोसळण्याची शक्यता असल्याने चिपळूण–कराड रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना मोठा धोका निर्माण झाला आहे.
सध्या हे झाड रस्त्यावर झुकलेल्या अवस्थेत असल्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी आणि पावसाळी वाऱ्याच्या परिस्थितीत अपघाताची शक्यता अधिक वाढली आहे.
स्थानिक नागरिक व वाहनधारकांनी संबंधित यंत्रणांनी तातडीने लक्ष घालून झाड हटवावे, अशी जोरदार मागणी केली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडण्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.
Views: 192














