WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

महायुतीच्या विजयी उमेदवारांचा उद्या जाहीर सत्कार


महायुतीच्या विजयी उमेदवारांचा उद्या जाहीर सत्कार

चिपळूण : चिपळूण नगर पालिका निवडणुकीमध्ये शिवसेना–भाजप–रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महायुतीने घवघवीत यश संपादन केले आहे. या निवडणुकीत महायुतीचे एकूण १६ उमेदवार विजयी झाले असून, नगराध्यक्षपदी श्री. उमेशदादा सकपाळ यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या यशाबद्दल नगराध्यक्षांसह सर्व विजयी नगरसेवकांचा जाहीर सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. पालकमंत्री ना. उदय सामंत हे या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.

हा सत्कार सोहळा सोमवार, दिनांक २२ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता चिपळूण येथील अतिथी हॉटेल हॉल, मुंबई–गोवा महामार्ग येथे संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमास नगराध्यक्ष उमेशदादा सकपाळ, माजी आमदार सदानंद चव्हाण, भाजप नेते प्रशांत यादव यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, शिवसेना–भाजप–रिपाइं महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

नगर पालिका निवडणुकीतील या यशामुळे चिपळूणच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात असून, महायुतीच्या नेतृत्वाखाली शहराचा सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात येणार आहे.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!