WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

चिपळुणातील खोल नाल्यात दुचाकीसह कोसळले तिघेजण


चिपळुणातील खोल नाल्यात दुचाकीसह कोसळले तिघेजण

एकास गंभीर दुखापत, क्रेनच्या सहाय्याने काढले बाहेर

चिपळूण : महामार्गावरील राधाकृष्ण नगर येथील मुत्तपन मंदिरच्या स्वागत कमानीच्या ठिकाणी खोल नाल्यात दुचाकी सह तिघेजण कोसळून अपघात झाल्याची घटना सोमवारी रात्री ९.१५ वाजता घडली. यामध्ये तिघेही तरुण जखमी झाले असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे.

महामार्गाने शहरातील बहादूरशेख नाका ते डीबीजे महाविद्यालयाच्या दिशेने हे तिघे तरुण एक्टिवा दुचाकीने ट्रिपल सीट चालले होते. अशातच त्यांचा राधाकृष्ण नगर येथील मुत्तपन मंदिरच्या कमानी जवळ येतात दुचाकी वरील ताबा सुटला. यामध्ये हे तिघेही दुचाकीसह खोल नाल्यात कोसळले. या नाल्यातून नगर परिषदेची पोलादी पाईपलाईन गेली असून त्यावर हे तिघेही आदळले. त्यामुळे एकाच्या हाताला गंभीर दुखापत झाले आहे. तो तरुण जागीच बेशुद्ध अवस्थेत पडला होता. तसेच अन्य दोघांना देखील दुखापत झाली आहे. त्यांना तात्काळ मदत देण्यासाठी काही नागरिक थेट नाल्यांमध्ये उतरले, परंतु नाल्याच्या दोन्ही बाजूने उंच भिंत असल्यामुळे त्यांना बाहेर काढणे शक्य नव्हते. त्याचवेळी महामार्गाने क्रेन जाताना काही नागरिकांना दिसून आला. तो क्रेन घटनास्थळी आणून संबंधित तरुणांना क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्यात आले. त्यानंतर नजीकच्या रुग्णालयात त्यांना उपचार साठी देण्यात आले आहे. हे तिन्ही तरुण चिपळूण शहरातील रहिवासी असून त्यातील दोघेजण शहरातील खेंड विभागातील स्थायिक असल्याचे समजते.


595
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!