WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

मूल विक्रीत ‘सावर्डे’ कनेक्शन’ने चिंता वाढली! वर्षभरातील दुसरी घटना, पोलीस यंत्रणेच्या


मूल विक्रीत ‘सावर्डे’ कनेक्शन’ने चिंता वाढली!

वर्षभरातील दुसरी घटना, पोलीस यंत्रणेच्या सतर्कतेमुळे प्रकार उघड

चिपळूण : दहा महिन्यांपूर्वी बेळगावच्या हुक्केरी तालुक्यातील मुलाच्या विक्री प्रकरणात चिपळूणचे सावर्डे कनेक्शन उघड झाले होते. त्यापाठोपाठ राजस्थानहुन फुगे विकण्यासाठी सांगलीत आलेल्या गरीब दांपत्याच्या वर्षाच्या तान्हुल्याचे दिवाळीच्या पहिल्याच दिवशी अपहरण करून चिपळूणच्या ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकास विकण्याचा डाव सांगली स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने उधळून लावला. यातही सावर्डे कनेक्शन असल्याने चिपळूणवासीयांनाच धक्का बसला. वर्षभरात येथे दुसऱ्यांदा हा प्रकार घडला असून पोलीस यंत्रणेच्या सातर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आल्याने त्यांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त होत आहे.
यापूर्वी जानेवारी २०२५ मध्ये बेळगावच्या हुक्केरी तालुक्यातील मुलाच्या विक्री प्रकरणात महाराष्ट्रातील तिघांना हुक्केरी पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याकडील मूल चिपळूण तालुक्यातील सावर्डे विभागातील निवळी येथे व त्यानंतर रत्नागिरी जयगड येथे वास्तव्यास होते. संगीता सोमा हम्मण्णावर ऊर्फ गवळी (४०, रा. माद्याळ, गडहिंग्लज, कोल्हापूर), मोहन बाबाजी तावडे (६४), संगीता मोहन तावडे ऊर्फ संगीता पीरप्पा तळवार (४५, दोघे रा. निवळी, चिपळूण, रत्नागिरी) अशी तिघांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी एका महिन्यात मुलांच्या विक्रीचे तीन प्रकरणे पुढे आली होती. त्यानंतर आता राजस्थानहुन फुगे विकण्यासाठी सांगलीत आलेल्या गरीब दांपत्याच्या वर्षाच्या तान्हुल्याचे दिवाळीच्या पहिल्याच दिवशी अपहरण करून चिपळूणच्या ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकास विकण्याचा प्रयत्न झाला. सुदैवाने हा मूल विक्रीचा डाव सांगली (एलसीबी) स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने उधळून लावला. एवढेच नव्हे तर मुलाचे अपहरण करणाऱ्या तीन जणांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात सांगली एलसीबीला यश आले. या प्रकरणातही चिपळूण सावर्डे कनेक्शन उघड झाल्यानंतर एकास अटक करण्यात आली आहे. मात्र इनायत अब्दुलसत्तार गोलंदाज ( ४३, रा. किल्ला भाग, मिरज, सांगली) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून इम्तीयाज पठाण व त्याची पत्नी वसीमा इम्तीयाज पठाण हे अजूनही पसार आहेत. त्या दोघांचा शोध सुरूच आहे.
या प्रकरणी सावर्डे येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक सचिन राजेशिर्के याला सांगली स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने अवघ्या ७२ तासात ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. डेरवण कुडप फाटा येथे त्याचा व्यवसाय असून तो डेरवण परिसरातच वास्तव्यास
आहे. साधारण दहा वर्षांपूर्वी त्याचे लग्न झाले असले तरी अद्याप त्याला मूल नाही. त्यामुळे मूल दत्तक घेण्याचा प्रयत्न सुरु होता. अशातच राजेशिर्के हा या प्रकरणात अडकल्याने सांगलीतील पोलिसांना चिपळूणपर्यंत चिमुकल्या बाळाला शोध घेण्यासाठी मोहीम राबवावी लागली. मात्र त्याचवेळी बाळ विक्री संदर्भात वर्षभरातील ही दुसरी घटना असल्याने चिपळूणवासीयही चिंता व्यक्त करत आहेत.


620
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!