राजकीय Archives - न्यूज हाऊस News house

‘प्रमोद जठार माझे जुने मित्र; त्यांच्या सहानुभूतीबद्दल धन्यवाद : आमदार भास्करराव जाधव
‘प्रमोद जठार माझे जुने मित्र; त्यांच्या सहानुभूतीबद्दल धन्यवाद : आमदार भास्करराव जाधव

विरोधी पक्षनेतेपद सरकार आणि विधानसभा अध्यक्षांच्या हातात असल्याचेही केले स्पष्ट

चिपळूण : भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रमोद जठार यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आमदार भास्कर जाधव यांना भाजपमध्ये येण्याची खुली ऑफर दिल्यानंतर त्यावर आमदार भास्कर जाधव यांनीही मिश्किलपणे आपली प्रतिक्रिया दिली. ‘प्रमोद जठार माझे जुने मित्र असल्याचे सांगत त्यांच्या सहानुभूतीबद्दल धन्यवाद मानले.

प्रमोद जठार यांनी बुधवारी चिपळूण येथे बोलताना, “शिवसेना उबाठामध्ये भास्कर जाधव यांना त्यांच्या क्षमतेप्रमाणे काम दिले जात नाही. ते नाराज आहेत. कोकणाला भास्कर जाधव यांच्यासारख्या नेत्याची गरज आहे. त्यांनी योग्य विचार करावा. भारतीय जनता पक्षात त्यांचे स्वागत आहे,” असे म्हणत त्यांना भाजपमध्ये येण्याचे खुले निमंत्रण दिले होते.

या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना आमदार भास्कर जाधव म्हणाले, “प्रमोद जठार हे माझे खूप जुने मित्र आहेत. आम्ही पाच वर्षे एकत्र विधिमंडळात काम केले आहे. त्याचप्रमाणे आज ज्या पक्षातील काही नेत्यांसोबत ते आहेत, त्या नेत्यांच्या विरोधात आम्ही दोघांनी नगरपालिकेत एकत्र काम केलेले आहे. त्या काळात सिंधुदुर्गातील भाजपचे प्रमुख नेते प्रमोद जठारच होते.”

ते पुढे म्हणाले, “प्रमोद जठार यांना माझी काम करण्याची पद्धत पूर्णपणे माहिती आहे. मी एकदा एखाद्याला शब्द दिला की, तो शब्द पाळण्यासाठी कोणतेही संकट अंगावर घेण्याची माझी तयारी असते. त्यामुळे आदरापोटी त्यांनी माझ्याबद्दल जे काही वक्तव्य केले असेल. माझ्याबद्दल त्यांना एवढी सहानुभूती आहे, याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो.”

दरम्यान, विरोधी पक्षनेतेपदाबाबत सुरू असलेल्या चर्चेवरही भास्कर जाधव यांनी भाष्य केले. ते म्हणाले, “विरोधी पक्षनेता म्हणून नाव जाहीर करण्याची जबाबदारी सरकारची आणि विधानसभा अध्यक्षांची आहे. सरकारने प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांकडे पाठवायचा असतो आणि त्यानंतर अध्यक्ष त्याची घोषणा करतात. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद जाहीर करणे ही माझ्या पक्षप्रमुखांची जबाबदारी नाही.”

यावेळी त्यांनी प्रमोद जठार यांना आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल पुन्हा शुभेच्छा दिल्या. “मी त्यांचे अभिनंदन केले आहे. मित्र म्हणून जर त्यांनी माझ्यासाठी पुढाकार घेतला आणि त्यांच्या मुख्यमंत्री तसेच विधानसभा अध्यक्षांकडे विरोधी पक्षनेतेपदाबाबत पाठपुरावा केला, तर आम्हाला आनंदच होईल. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानेन. मात्र हा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या हातात नसून मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष यांच्या अधिकारात आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजपकडून आलेल्या खुल्या ऑफरला थेट नकार किंवा स्वीकार न देता, आपल्या शब्दाला आणि राजकीय बांधिलकीला प्राधान्य असल्याचे भास्कर जाधव यांनी आपल्या प्रतिक्रियेतून स्पष्ट केले. त्याचबरोबर विरोधी पक्षनेतेपदाबाबत सुरू असलेल्या राजकीय चर्चेवरही त्यांनी घटनात्मक प्रक्रिया अधोरेखित करत आपली भूमिका मांडली.

The post ‘प्रमोद जठार माझे जुने मित्र; त्यांच्या सहानुभूतीबद्दल धन्यवाद : आमदार भास्करराव जाधव appeared first on न्यूज हाऊस  News house .

भास्करराव जाधव, तुम्ही भाजपमध्ये या!
भास्करराव जाधव, तुम्ही भाजपमध्ये या!

आमदार प्रमोद जठारांची खुली ऑफर

कोकणच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण

🔷सुशांत कांबळे 🔷

चिपळूण : कोकणातील राजकारणात पुन्हा एकदा नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. ठाकरे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा, अशी थेट आणि खुली ऑफर भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार यांनी दिली. भास्कर जाधव यांच्यासारख्या अनुभवी आणि प्रभावी नेतृत्वाचा त्यांच्या पक्षात अपेक्षित सन्मान होत नसल्याचे सांगत, कोकणच्या विकासासाठी विकासाभिमुख शक्तींनी एकत्र येण्याची वेळ आली आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

चिपळूण येथे स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात प्रमोद जठार आणि भास्कर जाधव हे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. दोन्ही नेत्यांनी एकत्र वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जठार यांनी भास्कर जाधव यांच्याविषयी कौतुकाची भूमिका घेत त्यांना भाजपमध्ये येण्याचे थेट आवाहन केले.

“भास्कर जाधव हे कोकणातील ज्येष्ठ, अनुभवी आणि जनतेशी नाळ जुळलेले नेते आहेत. त्यांच्या अनुभवाचा राज्याच्या आणि विशेषतः कोकणच्या विकासासाठी अधिक प्रभावीपणे उपयोग होणे आवश्यक आहे. त्यांनी भाजपमध्ये येऊन विकासाच्या राजकारणात सहभागी व्हावे,” असे आवाहन जठार यांनी केले.

जठार यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे, त्यांनी भास्कर जाधव यांच्यावर वैयक्तिक टीका न करता त्यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत भाजपमध्ये येण्याचे निमंत्रण दिल्याने या वक्तव्याची अधिक चर्चा होत आहे.

या कार्यक्रमाला दक्षिण रत्नागिरी भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, सहदेव बेटकर तसेच भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जंतर-मंतर आंदोलनावर सरकारची भूमिका मांडली

दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या CJP आंदोलनावर बोलताना प्रमोद जठार यांनी आंदोलनात काही विघातक आणि देशविरोधी प्रवृत्तीच्या व्यक्तींनी घुसखोरी केल्याचा आरोप केला. अशा घटकांवर केंद्र सरकार कठोर कारवाई करेल आणि देशाच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे ते म्हणाले.

NEET गैरव्यवहारातील दोषींना पाठीशी घालणार नाही

NEET प्रश्नपत्रिका गैरव्यवहार प्रकरणावर प्रतिक्रिया देताना जठार म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यास सक्षम असून, या प्रकरणात कोणालाही वाचवले जाणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विरोधकांवरही टीकेची झोड

यावेळी प्रमोद जठार यांनी विरोधी पक्षांवरही निशाणा साधला. राज्यात आणि देशात विरोधी पक्षांकडे प्रभावी नेतृत्व उरले नसल्यामुळे त्यांना काँग्रेसवर अवलंबून राहावे लागत आहे, असा दावा त्यांनी केला. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणाऱ्या आंदोलनांमुळे काँग्रेसचेच राजकीय नुकसान होत असल्याची टीकाही त्यांनी केली.

आधी आशिष शेलारांची भेट, आता जठारांची ऑफर; चर्चांना वेग

काही दिवसांपूर्वी भाजपचे वरिष्ठ नेते तथा मंत्री आशिष शेलार यांनी रत्नागिरी दौऱ्यादरम्यान आमदार भास्कर जाधव यांच्या संपर्क कार्यालयाला भेट दिली होती. त्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर आता आमदार प्रमोद जठार यांनी भास्कर जाधव यांना जाहीरपणे भाजपमध्ये येण्याचे निमंत्रण दिल्याने या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.

भाजपकडून सातत्याने होत असलेल्या या सकारात्मक संकेतांवर ठाकरे शिवसेना किंवा स्वतः आमदार भास्कर जाधव काय भूमिका घेतात, याकडे आता कोकणातील राजकीय वर्तुळासह राज्याचे लक्ष लागले आहे.

The post भास्करराव जाधव, तुम्ही भाजपमध्ये या! appeared first on न्यूज हाऊस  News house .

ना. आशिष शेलार १५ जुलै रोजी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर
ना. आशिष शेलार १५ जुलै रोजी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर

चिपळुणातील कार्यकर्ता मेळावा, वाशिष्ठी डेअरी पाहणीसह विविध कार्यक्रम

चिपळूण : महाराष्ट्राचे इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता तसेच सांस्कृतिक कार्य मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री ना. अॅड. आशिष शेलार हे बुधवार, दि. १५ जुलै २०२६ रोजी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, या दौऱ्यात खेड, चिपळूण, संगमेश्वर आणि रत्नागिरी येथे विविध शासकीय, सामाजिक, सांस्कृतिक तसेच भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत.

दौऱ्याची सुरुवात पहाटे मुंबई येथून वंदे भारत एक्सप्रेसने होणार असून, सकाळी ८.४४ वाजता खेड रेल्वे स्थानकावर त्यांचे आगमन होईल. तेथे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर ते खेड येथील भाजप मंडळाध्यक्ष श्री. विनोद चाळके यांच्या निवासस्थानी भेट देतील. यावेळी आमदार प्रमोद जठार हे देखील उपस्थितीत राहणार आहेत.

यानंतर ना. शेलार सकाळी १० वाजता चिपळूण येथील वाशिष्ठी डेअरीची पाहणी करणार असून, स्थानिक पातळीवरील दुग्ध व्यवसाय व विकासासंदर्भातील माहिती घेणार आहेत. त्यानंतर सकाळी ११ वाजता बहादूरशेख नाका येथील सहकार भवनात भारतीय जनता पक्ष रत्नागिरी (दक्षिण) जिल्ह्याच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळावा व सत्कार समारंभात ते मार्गदर्शन करणार आहेत. जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष, मोर्चा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांसाठी हा मेळावा महत्त्वाचा मानला जात आहे.

यानंतर दुपारी भाजप जिल्हा कार्यालयाला भेट देऊन पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर ते संगमेश्वरकडे रवाना होतील. संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारकाला भेट देऊन अभिवादन करतील. त्यानंतर जाखादेवी परिसरातील जागतिक महत्त्वाच्या कातळशिल्पांची पाहणी करून पुरातत्त्व विभागाकडून माहिती घेणार आहेत.

सायंकाळी रत्नागिरी शहरात आगमनानंतर नमन व जाखडी कलाकारांच्या सत्कार समारंभाला उपस्थित राहून स्थानिक लोककलेचा गौरव करतील. त्यानंतर महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या कबड्डी दिन कार्यक्रमात तसेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित सांगीतिक कार्यक्रमालाही ते उपस्थित राहणार आहेत. रात्री कोकण कन्या एक्सप्रेसने ते मुंबईकडे प्रस्थान करणार असून, १६ जुलै रोजी पहाटे मुंबईत दौऱ्याची सांगता होईल.

भाजप रत्नागिरी (दक्षिण) जिल्ह्याच्या वतीने सर्व पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष, शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, मोर्चा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी १५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता सहकार भवन, बहादूरशेख नाका, चिपळूण येथे वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन दक्षिण व उत्तर जिल्ह्याचे अध्यक्ष प्रशांत यादव आणि सतीश मोरे यांनी केले आहे.

The post ना. आशिष शेलार १५ जुलै रोजी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर appeared first on न्यूज हाऊस  News house .

पंचायत समिती सदस्यांना हलक्यात घेऊ नका : सदस्यांचा इशारा
पंचायत समिती सदस्यांना हलक्यात घेऊ नका

मुंढे येथे पंचायत समितीची मासिक सभा,  कामातील दिरंगाइने अधिकाऱ्यांना इशारा

पिंपळी बुद्रुक, खडपोली, मालघर या स्मार्ट ग्रामपंचायतींचा गौरव

चिपळूण : पंचायत समिती सदस्यांनी गली तीन महिने राष्ट्रीय महामार्ग विभागाबाबत विविध समस्या मांडल्या, उपोषणाचा इशारा दिला, तरी या विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कोणतेही काम होत नाही. आता करतो, नंतर करतो, काम सुरू होइल, यापलिकडे उत्तर मिळत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाची देखील अशीच अवस्था आहे. त्यामुळे पंचायत समिती सदस्या अधिकाऱ्यांनी हलक्यात घेऊ नये, आता उपोषण नाही तर रास्ता रोको करू असा इशारा पंचायत समितीच्या सभेत सदस्यांनी दिला.

चिपळूण पंचायत समितीची मासिक सभा मुंढे येथील जिल्हा परिषद आदर्श शाळेच्या सभागृहात सभापती सुर्यकांत खेतले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपसभापती संदेश आयरे, गटविकास अधिकारी सौ. उमा घार्गे पाटील यांच्यासह सदस्य आणि विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या आढाव्यात सदस्यांनी संताप व्यक्त केला. गेले तीन महिने सदस्य सातत्याने राष्ट्रीय महामार्ग बाबतच्या समस्या मासिक सभेत मांडत आहेत. प्रत्येकवेळी काम होइल, लवकरच सुरू केले जाईल, चार आठ दिवसात काम मार्गी लागेल, अशी आश्वासने दिली जातात. मात्र प्रत्यक्षात हालचाली होत नाही. पुन्हा नव्याने सभेत त्याच समस्या सभेत मांडाव्या लागतात. यावरून सदस्य सुभाष जाधव, विनोद भूरण, विनोद झगडे, गौरव पाटेकर, शौकत माखजनकर, सौ. उज्वला घाग, सौ. स्नेहा साळवी म्हणाल्या, तालुक्यातील समस्या सदस्यांच्या माध्यमातून मासिक सभेत मांडल्या जातात. या समस्यावर अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करायला हवी. मात्र प्रत्यक्षात अधिकारी दखल घेत नसल्याचे वास्तव आहे.

कामे होणारच नसतील तर सभेचा उपयोग काय, कशाला येथे समस्या मांडायच्या, अधिकाऱ्यांनो सदस्यांना हलक्यात घेऊ नका, अन्यथा महागात पडेल, असा इशारा देण्यात आला. राष्ट्रीय महामार्ग विषयाबाबत आठवड्यात स्वतंत्र संयुक्त बैठक घेण्याचे ठरवण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आढाव्यातही अशीच अवस्था दिसून आली. रोहयोचे अधिकारी सभेत येत नसल्याचे सदस्यांनी सांगितले. त्याचबरोबर महसूल विभागावरही सदस्यांनी ताशेरे ओढले. महसूलच्या अधिकाऱ्यांना मासिक सभेचे निमंत्रण देऊनही ते उपस्थित राहत नाहीत. महसूल बाबत ग्रामस्थांच्या अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे महसूलच्या अधिकाऱ्यांना नोटीस देण्याचे आश्वासन गटविकास अधिकाऱ्यांनी दिले.

यानिमित्ताने तालुक्यातील गेल्या तीन वर्षात स्मार्ट ग्राम मध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या मालघर, खडपोली आणि पिंपळी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना सभापती, उपसभापती व बीडीओंच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

चिपळूण पंचायत समितीत गेली ४१ वर्षे हवालदार म्हणून सेवा बजावणारे अरविंद कृष्णा चव्हाण हे ३० जून रोजी सेवा निवृत्त होत आहेत. गेली ४१ वर्षे सर्वांशी मिळून मिसळून वागणारे, ग्रामस्थांना विनम्र सेवा देणारे, कामांचा वेळेत निपटारा करणारे आणि अजातशत्रू म्हणून ओळख असलेले हवालदार चव्हाण यांचा मासिक सभेच्या निमीत्ताने सेवानिवृत्तीपर सत्कार करण्यात आला. यावेळी सभापती, उपसभापती सर्व सदस्य आणि अधिकारी उपस्थित होते.

The post पंचायत समिती सदस्यांना हलक्यात घेऊ नका : सदस्यांचा इशारा appeared first on न्यूज हाऊस  News house .

प्रशांत यादव पुढील काळात मंत्री म्हणून काम करतील : आमदार प्रमोद जठार
प्रशांत यादव पुढील काळात मंत्री म्हणून काम करतील : आमदार प्रमोद जठार

चिपळुणातील जनसंपर्क कार्यालयाचे शानदार उद्घाटन

चिपळूण : चिपळूणच्या गल्ली मधील भाजप प्रशांत यादव यांनी हायवेवर आणली, आता हायवे वरून प्रशांत यादव थेट विधान भवनात प्रवेश करतील. विधानसभेत फक्त प्रवेशच नव्हे तर पुढील मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करतील, असा विश्वास व्यक्त करत आमदार प्रमोद जठार यांनी आता थांबायचे नाही, आज पासूनच नव्हे तर आता पासून कामाला लागा असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव व उपस्थित कार्यकर्त्यांना केले. आता शतप्रतिशत भाजप हे ध्येय असले पाहिजे असेही ते म्हणाले.

भारतीय जनता पार्टीचे रत्नागिरी दक्षिणचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील पाग येथील कृष्णेश्वर नगर येथे भाजपचे नूतन जनसंपर्क कार्यालय उभारले असून त्याचा उदघाटन सोहळा रविवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. अत्यंत दिमाखदार अशा या उदघाटन सोहळ्याला भाजप नेते आमदार प्रमोद जठार प्रमुख उदघाटक म्हणून उपस्थित होते. फित कापून आमदार प्रमोद जठार यांनी कार्यालयाचे उद्घाटन केले तर मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले. यावेळी फटाक्यांची प्रचंड आतिषबाजी करण्यात आली.

यावेळी आमदार जठार म्हणाले, मी कार्यकर्त्यांचा आमदार आहे. मी जनतेतून निवडुन आलेलो नाही तर पक्षाने मला आमदारकी दिली आहे. पक्ष म्हणजेच पक्षाचे कार्यकर्ते, त्यामुळे मी कार्यकर्त्यांचा आमदार असल्याने सतत कार्यकर्त्यामध्ये राहून त्यांचे म्हणणे ऐकून घेत असतो. त्यामुळे मी सतत फिरत राहतो. चिपळूण मध्ये देखील मी सतत येत असतो, या पुढे देखील मी येथे येत राहणार आहे. आज प्रशांत यादव यांच्या कार्यालयाचे उदघाटन माझ्या हस्ते झाले याचा मनस्वी आनंद मला आहे.

या कार्यालयातून सर्वसामान्य जनतेची सेवा होत राहील. कार्यकर्त्यांचे प्रश्न येथून सोडवले जातील. आणि भारतीय जनता पार्टीला या कार्यालयातून नवे बळ मिळेल असेही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवसातून किती तास झोपतात हे माहीत नाही,पण त्यांचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ आणि गेली १२ वर्षातील पंतप्रधान पदाचा कार्यकाळ बघता ते अहोरात्र काम करत आहेत. देव, देश,धर्म सर्व क्षेत्रात त्यांचे काम असून ते आपल्या देशातील एक यशस्वी पंतप्रधान ठरले आहेत. भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्यांचा आदर्श समोर ठेवला पाहिजे, असे आमदार जठार म्हणाले.

चिपळुणात गल्लीतली भाजप असा उल्लेख केला जात होता. प्रशांत यादव यांनी गल्लीतील भाजप हायवेवर आणली, आता हायवेवरून प्रशांत यादव थेट विधानभवनात पोहचतील आणि विधान भवनात नव्हे तर भाजपच्या मंत्रिमंडळात प्रशांत यादव दिसतील. दस्तुरखुद्द नरेंद्रचार्यजी महाराज यांनी त्यांना आशीर्वाद दिलेले आहेत.त्यामुळे प्रशांत यादव आता थांबायचे नाही.सुसाट धाव घ्यायची आहे, असेही ते म्हणाले.

आता शतप्रतिशत भाजप : प्रशांत यादव

जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी घेतल्यानंतर मी न थांबता काम करत आहे.पक्षाचे जिल्ह्याचे कार्यालय रत्नागिरीत आहे. परंतु चिपळूण आणि आजूबाजूच्या तालुक्यातील जनतेला, कार्यकर्त्यांना सहज भेटता यावे, संपर्क आणि समन्वय कायम रहावा यासाठी चिपळूणमध्ये कार्यालय असावे अशी मनोमन इच्छा होती. योग्य अशी जागा आम्ही शोधत होतो. आता महामार्गवरच जागा उपलब्ध झाली आहे. या कार्यालयातून सर्वसामान्य जनतेची कामे होतील आणि आगामी काळात जिल्ह्यात शतप्रतिशत भाजप दिसेल असा विश्वास प्रशांत यादव यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक सौ.स्वप्ना यादव, चिपळूण नागरी पतसंस्थेच्या संचालिका सौ.स्मिता सुभाषराव चव्हाण, ऍड.नयना पवार, जिल्हा उपाध्यक्ष बळीराम मोरे, जिल्हा सरचिटणीस स्वानंद रानडे, जिल्हा महिला सरचिटणीस सुप्रिया उतेकर, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष लियाकत शाह, जिल्हा किसान मोर्चा अध्यक्ष अजित निकम, जि.प. सदस्य रावी मोरे, दीप्ती महाडिक, तालुका मंडल अध्यक्ष विनोद भुरण, संगमेश्वर मंडल अध्यक्ष विनोद म्हस्के, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष आदिती गुडेकर, शहर मंडल अध्यक्ष शशिकांत मोदी, उपनगराध्यक्षा रुपाली दांडेकर, नगरसेविका अंजली कदम, वैशाली निमकर, रसिका देवळेकर, शीतल रानडे, नगरसेवक शुभम पिसे, संदीप भिसे, माजी नगरसेवक विजय चितळे, रामदास राणे, नॅब हॉस्पिटलचे अध्यक्ष निलेश भुरण, चिपळूण अर्बन बँकेचे संचालक रत्नदीप देवळेकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य चंद्रकांत जाधव, योगेश शिर्के, विजय देसाई, अन्वर जबले, शामून घारे, प्रथमेश शिंदे, जनार्दन पवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

The post प्रशांत यादव पुढील काळात मंत्री म्हणून काम करतील : आमदार प्रमोद जठार appeared first on न्यूज हाऊस  News house .

बाळ माने यांचे राजकारण म्हणजे स्वार्थासाठी डबकी बदलण्याचा इतिहास : विनायक राऊत
बाळ माने यांचे राजकारण म्हणजे स्वार्थासाठी डबकी बदलण्याचा इतिहास : विनायक राऊत

मुंबई : विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेऊन बाळ माने यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मतदारांचा विश्वासघात केल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते तथा पक्षाचे सचिव व माजी खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. बाळ माने यांचा हा निर्णय अचानक घेतलेला नसून त्यामागे पूर्वनियोजित राजकीय षडयंत्र असल्याचा दावा त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनातून केला.

राऊत यांनी म्हटले आहे की, उमेदवारी अर्ज दाखल करतानाच दुसरा कोणताही डमी उमेदवार उभा राहू नये यासाठी बाळ माने यांनी मोठ्या प्रमाणावर मतदारांच्या सह्या गोळा करून ठेवल्या होत्या. तसेच चार-चार अर्ज दाखल करून इतर संभाव्य पर्याय बंद करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्यांच्या मनात सुरुवातीपासूनच वेगळे राजकीय डावपेच सुरू असल्याचे स्पष्ट होते, असे त्यांनी नमूद केले.

बाळ माने यांनी वरिष्ठ नेत्यांनी दाद दिली नसल्याचा दावा केला असला, तरी उमेदवारी मिळवण्यासाठी ते सातत्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात होते. त्यांना प्रत्यक्ष भेटीसाठी बोलावण्यात आले होते, मात्र त्यांनी वेळकाढूपणा केला. त्यामुळे संवाद झाला नाही, हा दावा वस्तुस्थितीला धरून नसल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.

वैयक्तिक आरोपांवरही पलटवार

स्वतःवरील आरोपांना उत्तर देताना विनायक राऊत यांनी म्हटले की, माझ्यावर वैयक्तिक आरोप करून स्वतःची बेईमानी झाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. पालघर प्रकरण किंवा कार्यकर्त्यांकडून पैसे घेतल्याचे आरोप करणाऱ्यांकडे पुरावे असतील तर त्यांनी ते जाहीर करावेत. शिवसेनेसाठी आयुष्य घालवणाऱ्या कार्यकर्त्यांवर बोट दाखवण्यापूर्वी स्वतःचा राजकीय इतिहास तपासण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच माझ्यावर तथाकथित “रिचार्ज” घेण्याचे आरोप करणाऱ्यांनी प्रथम स्वतः कोणत्या पक्षांशी बेईमानी केली याचे उत्तर द्यावे, असे सांगत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवास करून आता पुन्हा सत्ताधाऱ्यांच्या दिशेने वाटचाल करणाऱ्यांनी निष्ठेबाबत भाष्य करणे हा विनोद असल्याची टीका त्यांनी केली.

उमेदवारीलाच होता विरोध

राऊत यांनी दावा केला की, विधानसभा निवडणुकीत बाळ माने यांना उमेदवारी देण्यास त्यांचा सुरुवातीपासूनच विरोध होता. तत्कालीन जिल्हाप्रमुख विलास चाळके यांच्यासह त्यांनी उदय बने हे अधिक सक्षम व निष्ठावंत उमेदवार ठरतील, अशी भूमिका पक्षप्रमुखांसमोर मांडली होती. आज घडलेल्या घटनांमुळे त्यांची ती भूमिका योग्य असल्याचे सिद्ध झाले असल्याचे त्यांनी म्हटले. नगरपालिका निवडणुकीतही सक्षम उमेदवारांना संधी न देता स्वतःच्या घरातील उमेदवारांना प्राधान्य देण्यात आले आणि त्यामुळे महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीबाबत पक्षात पूर्वीपासूनच नाराजी होती, असा दावाही त्यांनी केला.

आर्थिक व्यवहारांबाबत प्रश्नचिन्ह

बाळ माने यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर काही सत्ताधारी नेत्यांसोबत त्यांची उपस्थिती, विशेष विमान प्रवास तसेच निवडणूक बिनविरोध करण्यासाठी कथित आर्थिक व्यवहार झाल्याच्या चर्चांमुळे जनतेच्या मनात गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे राऊत यांनी म्हटले. संपूर्ण कोकण आणि महाराष्ट्रात या संदर्भातील चर्चांना उधाण आले असून पैशाच्या जोरावर लोकशाही प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचे प्रकार चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले.

“एकटे आले, एकटेच गेले”

पक्षप्रवेशाला विरोध केल्याचा आरोप फेटाळून लावताना राऊत म्हणाले की, त्यांचा विरोध व्यक्तीला नव्हता तर बाळ माने यांच्या राजकीय प्रवृत्तीला आणि निष्ठेबाबत असलेल्या शंकांना होता. संधी मिळाल्यानंतर ते पुन्हा राजकीय उडी मारतील, अशी भीती होती आणि आज नेमके तेच घडल्याचा दावा त्यांनी केला. शेकापला उमेदवारी देण्याचा निर्णय असो किंवा पक्षातील इतर प्रश्न, त्यावर पक्षांतर्गत चर्चा करण्याचे अनेक मार्ग उपलब्ध होते. मात्र अर्ज मागे घेऊन पक्षालाच अडचणीत आणण्याचा मार्ग निवडण्यात आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. शिवसेनेचे नुकसान झाल्याचा दावा केला जात असला तरी बाळ माने पक्षात आले तेव्हा एकटे आले होते आणि आजही एकटेच गेले आहेत. त्यांच्यासोबत शिवसैनिक गेलेले नाहीत. शिवसेना व्यक्तीवर नव्हे तर विचार आणि निष्ठेवर उभी आहे, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

निष्ठावंत शिवसैनिकांच्या बळावर शिवसेना अधिक मजबूत होईल

राज्यात पैशाचे, दबावाचे आणि राजकीय दलालीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत असला तरी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना निष्ठावंत शिवसैनिकांच्या बळावर अधिक जोमाने उभी राहील, असा विश्वास विनायक राऊत यांनी व्यक्त केला. स्वार्थासाठी डबकी बदलणाऱ्यांमुळे शिवसेना थांबणार नाही, उलट अशा घटनांमुळे निष्ठा आणि विश्वासाचे महत्त्व अधिक अधोरेखित होईल, असे त्यांनी शेवटी म्हटले.

The post बाळ माने यांचे राजकारण म्हणजे स्वार्थासाठी डबकी बदलण्याचा इतिहास : विनायक राऊत appeared first on न्यूज हाऊस  News house .

महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांची निवडणुकीतून माघार
महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांची निवडणुकीतून माघार

नितेश राणे यांच्या मध्यस्थीने कोकणच्या राजकारणात मोठा ट्विस्ट

कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघातील समीकरणे बदलली

महायुतीची ताकद वाढल्याची चर्चा

रत्नागिरी : कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीत गुरुवारी अनपेक्षित घडामोड घडली असून महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांनी ऐनवेळी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची घोषणा केली. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत हा निर्णय जाहीर करण्यात आल्याने कोकणच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या घडामोडीमुळे निवडणुकीचे संपूर्ण राजकीय गणित बदलले असून आगामी मतदानावर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीत सुरुवातीपासूनच प्रतिष्ठेची मानली जात होती. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत होणार अशी अपेक्षा असताना बाळ माने यांच्या अचानक माघारीमुळे राजकीय वातावरणाला नवे वळण मिळाले आहे.

“घोडेबाजार टाळण्यासाठी माघार” – बाळ माने

उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना बाळ माने यांनी आपल्या निर्णयामागील भूमिका स्पष्ट केली. मतदारसंघात पैशाचा आणि सत्तेचा प्रभाव वाढून अनावश्यक राजकीय व्यवहार अथवा “घोडेबाजार” होण्याची शक्यता लक्षात घेऊन आपण निवडणुकीतून बाजूला होण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

“कोकणच्या राजकारणात स्वच्छता, पारदर्शकता आणि मूल्याधिष्ठित राजकारण टिकून राहावे, यासाठी हा निर्णय घेतला आहे. वैयक्तिक राजकीय हितापेक्षा व्यापक हिताला प्राधान्य देणे आवश्यक आहे,” असे माने यांनी नमूद केले.

महायुतीचे प्रतिनिधी म्हणून नितेश राणे यांची भूमिका चर्चेत

या संपूर्ण प्रक्रियेत मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती विशेष चर्चेचा विषय ठरली. महायुतीच्या वतीने त्यांनी परिस्थितीवर लक्ष ठेवत विविध स्तरांवर संवाद साधल्याचे बोलले जात आहे. माने यांच्या माघारीनंतर बोलताना राणे यांनी कोकणातील राजकारण अधिक पारदर्शक आणि जनाभिमुख व्हावे, ही महायुतीची भूमिका असल्याचे स्पष्ट केले.

“कोकणातील जनतेचा लोकशाही प्रक्रियेवरील विश्वास कायम राहणे महत्त्वाचे आहे. राजकारणात अनावश्यक व्यवहारांना स्थान नसावे. बाळ माने यांनी घेतलेला निर्णय हा राजकीय प्रगल्भतेचा नमुना आहे,” असे राणे म्हणाले.

निवडणुकीच्या समीकरणांना नवे वळण

बाळ माने यांच्या माघारीमुळे कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीचे चित्र मोठ्या प्रमाणात बदलले आहे. महाविकास आघाडीच्या गोटात या निर्णयाचे पडसाद उमटण्याची शक्यता असून महायुतीला याचा राजकीय लाभ होण्याची चर्चा सुरू झाली आहे. निवडणुकीपूर्वी झालेल्या या घडामोडीमुळे विरोधकांची रणनीती कोलमडल्याचे बोलले जात आहे.

राजकीय निरीक्षकांच्या मते, या निर्णयामुळे महायुतीची संघटनात्मक ताकद आणि प्रभाव पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. विशेषतः कोकणातील राजकीय घडामोडींमध्ये नितेश राणे यांचा वाढता प्रभाव या निमित्ताने पुन्हा चर्चेत आला आहे.

कोकणच्या राजकारणात चर्चांचा पूर

बाळ माने यांच्या माघारीमागे नेमकी कोणती राजकीय कारणे आहेत, याबाबत विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. मात्र या निर्णयामुळे कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणूक अधिक रंगतदार बनली असून आगामी काळात राजकीय समीकरणांमध्ये आणखी बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोकणातील या अनपेक्षित राजकीय घडामोडीमुळे विधान परिषद निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून येत्या काही दिवसांत याचे दूरगामी राजकीय परिणाम दिसून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

The post महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांची निवडणुकीतून माघार appeared first on न्यूज हाऊस  News house .

गुहागर विधानसभा मतदारसंघात अडीच हजार झाडे लावणार
गुहागर विधानसभा मतदारसंघात अडीच हजार झाडे लावणार

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त उपक्रम

चिपळूण : शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 6 जून रोजी गुहागर विधानसभा मतदारसंघात प्रत्येक गावात दहा झाडे अशी एकूण अडीच हजार झाडे लावण्याचा संकल्प शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य श्री. विक्रांत जाधव यांनी केला आहे. 6 जून रोजी श्री. विक्रांत जाधव यांचा वाढदिवस देखील असतो.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत त्यामध्ये ‘वृक्ष लावा दारोदारी समृद्धी येईल घरोघरी’ हे ब्रीदवाक्य घेऊन गुहागर विधानसभा मतदारसंघात गावागावात वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

उन्हाळ्यात कोकणात तापमानाचा पारा 42 अंश सेल्सिअसच्या घरात पोहोचला होता त्यामुळे पर्यावरण समतोल राखण्यासाठी आता प्रत्येकाने वृक्ष लागवड करून पर्यावरण संवर्धनाचे कार्य करणे आवश्यक आहे. या उद्देशाने हा उपक्रम जिल्हाप्रमुख श्री. विक्रांत जाधव यांनी हाती घेतला आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी गुहागर मतदारसंघातील पक्षाचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक प्रयत्नशील आहेत.

The post गुहागर विधानसभा मतदारसंघात अडीच हजार झाडे लावणार appeared first on न्यूज हाऊस  News house .

चिपळुणात रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक
चिपळुणात रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक

🔷प्रदेश निरीक्षक विजय देसाई व आमदार रोहित पाटील यांची उपस्थिती

🔷नव्या पदनियुक्तींसह संघटन मजबुतीवर भर

चिपळूण : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सुरेश उर्फ बारक्याशेठ बने व महिला अध्यक्ष दीपिका कोतवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण तालुक्यात पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने रविवार दिनांक २४ मे रोजी सकाळी १०.३० वाजता प्रांत कार्यालय शेजारील शिक्षक पतपेढी हॉल, हायवे, चिपळूण येथे कार्यकर्ता मेळावा व पदनियुक्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्यातील महागाई, बेरोजगारी, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठवण्यासाठी पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात येणार असल्याची माहिती युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हा कार्याध्यक्ष अक्षय केदारी यांनी दिली.

रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सुरेश उर्फ बारक्याशेठ बने यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात पक्ष संघटन नव्या जोमाने कार्यरत असून विविध आघाड्या, सेल व विभागांमध्ये नव्या पदनियुक्तीद्वारे संघटन अधिक गतिमान करण्यावर भर दिला जात आहे. या बैठकीत चिपळूण तालुकाध्यक्षपदी माजी नगरसेवक राजेश केळस्कर, शहराध्यक्षपदी समीर दिवाकर देसाई, महिला तालुकाध्यक्षपदी अरुता आडविलकर तसेच महाराष्ट्र ओबीसी सेलच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी वासुदेव (वासुआप्पा) मेस्त्री यांच्या नियुक्तीची घोषणा अपेक्षित आहे.

महिला जिल्हाध्यक्ष दीपिकाताई कोतवडेकर यांनीही चिपळूण विधानसभा मतदारसंघात महिला संघटन अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला असून नव्या महिला नेतृत्वाला संधी देण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. महिला तालुकाध्यक्ष पदासाठी सक्षम नेतृत्व शोधून संघटन उभारणीमध्ये त्यांनी मोलाची भूमिका बजावलीआहे. अल्पसंख्यांक समाजामध्ये पक्षाची ताकद वाढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष रईस अलवी तसेच महिला शहराध्यक्ष रुक्सार अलवी यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते संघटन बांधणीत सक्रिय सहभाग घेत आहेत.

या बैठकीच्या आयोजनासाठी महिला पदाधिकारी, माजी नगरसेवक, विविध सेलचे पदाधिकारी, युवक कार्यकर्ते तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी पुढाकार घेतला आहे. युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हा कार्याध्यक्ष अक्षय केदारी यांनी युवकांमध्ये पक्ष संघटन वाढवण्यासाठी सातत्याने सक्रिय भूमिका घेतली असून नव्या युवकांना पक्षाशी जोडण्याचे काम प्रभावीपणे सुरू ठेवले आहे. युवकांमध्ये नव्या प्रेरणास्त्रोताच्या रूपात त्यांच्याकडे पाहिले जात असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.

तसेच सेवादलचे जिल्हाध्यक्ष याकुब खान, सामाजिक न्याय विभागाचे महेंद्र कदम, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुजाता तांबे, निलिमा भुवड तसेच शरद पवार साहेबांच्या विचारांशी एकनिष्ठ राहून कार्य करणाऱ्या विविध ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांचेही या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मोलाचे सहकार्य लाभले असल्याची माहिती आयोजकांतर्फे देण्यात आली.

“विधानसभा निवडणुकीनंतरही पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साह कायम असून शरद पवार साहेबांच्या विचारांशी एकनिष्ठ राहून पदाधिकारी नव्या उमेदीने काम करत आहेत. जिल्हाध्यक्ष सुरेश उर्फ बारक्याशेठ बने यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी जिल्ह्यात पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक वातावरण आहे,” असा विश्वास अक्षय केदारी यांनी व्यक्त केला.

या बैठकीला पक्षाचे प्रदेश निरीक्षक तथा रत्नागिरी जिल्ह्याचे निरीक्षक विजय देसाई, महिला जिल्हाध्यक्ष दीपिकाताई कोतवडेकर, विविध सेल व आघाड्यांचे जिल्हाध्यक्ष, सेवादल, सामाजिक न्याय विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. दिवंगत नेते तथा माजी गृहमंत्री आर. आर. पाटील (आबा) यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारे युवा नेते आमदार रोहित पाटील उपस्थित राहणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

चिपळूण तालुका व शहरातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, महिला आघाडी, शेतकरी, व्यापारी तसेच शरद पवार साहेबांच्या विचारांवर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

The post चिपळुणात रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक appeared first on न्यूज हाऊस  News house .

काँग्रेसकडून रत्नागिरी जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर
काँग्रेसकडून रत्नागिरी जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या

सोनललक्ष्मी घाग यांच्यावर दुसऱ्यांदा जबाबदारी, तर दक्षिणची धुरा जमीर खलिफेंकडे

चिपळूण : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी आणि पक्षाच्या कामगिरीत सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्रातील जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नवनियुक्त अध्यक्षांची यादी २० मे २०२६ रोजी जाहीर केली आहे. ‘संघटन सृजन अभियाना’चा एक भाग म्हणून करण्यात आलेल्या या संघटनात्मक जिल्ह्यांच्या पुनर्रचनेला आणि नवीन अध्यक्षांच्या नियुक्तीला काँग्रेस अध्यक्षांनी तात्काळ प्रभावाने मंजुरी दिली आहे. या नव्या बदलानुसार रत्नागिरी जिल्ह्यासाठी पूर्वी प्रमाणेच दोन स्वतंत्र नियुक्त्या करण्यात आल्या असून रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्षपदी सोनललक्ष्मी वीरधवल घाग यांची, तर रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्षपदी जमीर खलिफे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सोनललक्ष्मी घाग यांनी आजवर केलेल्या उल्लेखनीय कार्याची आणि स्थानिक निवडणुकांमध्ये पक्षाला मिळवून दिलेल्या यशाची पोचपावती म्हणून पक्षनेतृत्वाने त्यांच्यावर सलग दुसऱ्यांदा या पदाची जबाबदारी विश्वासाने सोपवली आहे. तत्पूर्वी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण विभागीय शिबीर दिनांक २७ व २८ फेब्रुवारी तर दिनांक १ मार्च रोजी चिपळूणमध्ये आयोजित करण्यात आले होते. रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे शिबिर पार पडले होते. या शिबिराच्या यशस्वी नियोजनाबद्दल काँग्रेस पक्ष श्रेष्ठींनी सोनललक्ष्मी घाग यांचे कौतुक केले होते. तसेच काँग्रेसच्या उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांनी एक वर्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत काँग्रेस पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने रत्नागिरी उत्तर तालुक्याचा दौरा करतांना काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पक्षीय कामकाजासंदर्भात मार्गदर्शन करतांना काँग्रेस घरोघरी पोहोचविण्याचे आवाहन केले होते. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत उमेदवार उभे करून काँग्रेसचे ‘हात’ चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी अविरत मेहनत घेतली. विशेष म्हणजे चिपळूण नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसचे तीन नगरसेवक निवडून आणलेच शिवाय नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार देऊन काँग्रेस निवडणूक रिंगणात असल्याचा इरादा स्पष्ट केला होता.

रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष जमीर खलिफे यांनी राजापूर नगर परिषद निवडणुकीत नेत्रदीपक कामगिरी केली आहे. तसेच काँग्रेसप्रती निष्ठा असून काँग्रेस पक्षवाढीसाठी ते सातत्याने झटत असतात.राजापूर नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसचे नगरसेवक निवडून आणण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. याची दखल घेऊन काँग्रेस पक्ष श्रेष्ठींनी जमीर खलिफेंकडे रत्नागिरी दक्षिणची धुरा सोपवली आहे.

या नियुक्त्या करण्यापूर्वी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने नेमलेल्या निरीक्षकांनी प्रत्येक जिल्ह्याचा सविस्तर आढावा घेतला. पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आणि अन्य घटकांशी चर्चा करून आपले सविस्तर अहवाल वरिष्ठांना सादर केले होते. अहवाल प्राप्त झाल्यानंतर निरीक्षकांसोबत आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत झालेल्या सविस्तर चर्चेनंतरच या अंतिम नियुक्त्यांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

सोनललक्ष्मी घाग आणि जमीर खलिफे यांची जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्याने त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पक्षाने युवा नेतृत्वाकडे नव्याने जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवल्याने कार्यकर्त्यामध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

The post काँग्रेसकडून रत्नागिरी जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर appeared first on न्यूज हाऊस  News house .