अलोरेतील छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरास जंबो प्रतिसाद
शिबीरात दिवसभर ग्रामस्थांची रेलचेल, ५०० हून अधिक जणांना लाभ
चिपळूण – तालुक्यातील अलोरे येथील करमणूक केंद्रात झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानास मोठा प्रतिसाद मिळाला. या शिबीरात एकाच छताखाली ग्रामस्थांना विविध प्रकारचे दाखले आणि शासकीय सेवांचा लाभ देण्यात आला. आरोग्य तपासणीसह, महसूल, कृषी, पंचायत समिती, भूमी अभिलेख आदी विविध विभागांकडून ग्रामस्थांना लाभ देण्यात आले. या शिबीरात ५०० हून अधिक महिला व ग्रामस्थ सहभाग झाले होते.
तालुक्यात गेल्या आठवड्यापासून या शिबीरास सुरवात झाली. मंडळनिहाय शिबिरीचे आयोजन केले जात आहे. सावर्डे येथे पहिले शिबीर झाल्यानंतर दुसरे शिबीर अलोरे येथे पार पडले. मंडळ अधिकारी सौ. दमयंती माने यांनी योग्य नियोजन आणि परिश्रम घेतल्याने शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला. शिबिरात दिवसभर ग्रामस्थांची रेलचेल सुरूच होती.
या शिबीरात तहसीलदार प्रविण लोकरे, सभापती सूर्यकांत खेतले, जिल्हा परिषद सदस्या सौ. नेहा रहाटे, सौ. विनया झगडे, पंचायत समिती सदस्य विनोद झगडे, सौ. स्नेहा साळवी व शिरगाव मंडळातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, पोलीस पाटील, सर्व प्रशासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ, शेतकरी, महिला, विद्यार्थी, पत्रकार सहभागी झाले होते.
या शिबीरात सातबारा ७२०, ८ अ २४५, मंजूर फेरफार २४, विविध प्रकारचे २५८ दाखले, २२ आधार अपटेड, तुकडे बंदी नियमिती करण फेरफार ७५, अकृषिक परवानगी ने कमी जास्त पत्रक झालेली प्रकरणे ६, सातबारा दुरूस्ती ४०, संजय गांधी योजना मंजूर लाभार्थी १०, पुरवठा विभागाकडून नाव कमी करणे, नाव वाढवणे नविन अंत्योदय शिधापत्रिकेचा ५१ जणांना लाभ देण्यात आला.
निवडणूक विभागाकडून ५४ जणांना लाभ देण्यात आला. कृषी विभागाकडून लाभार्थ्यांना शेती अवजारांचे साहित्य वाटप करतानाच महाविस्तार अॅपवर ५० जणांची नोंद करण्यात आली. याशिवाय अॅग्रीस्टॅक, पीएमकिसान नोंदणी करून महाडीबीटीचे अर्ज स्विकारण्यात आले. आयुष्यमान भारत कार्ड ६४ जणांना वितरीत केले. याचवेळी सर्व यंत्रणा तैनात केल्याने संबंधीत लाभार्थ्यांची ई के वाय सी करण्यात आली. तसेच पंचायत समिती कडून १० जणांना जन्म दाखले, विवाह प्रमाण पत्र ५, तर असेसमेंट उतारा १०, ७४ ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात आली. याचबरोबर आयुष्यमान भारत कार्ड ६४, वय वंदन कार्ड १०६ लोकांना देण्यात आले. भूमी अभिलेख विभागाकडून ई मोजणी, ई नकाशा तसेच प्रॉपर्टी कार्ड वारस तपास संदर्भात तसेच सहकार विभागाने सहकारी संस्थाकडून विविध योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय भूसंपादन १, अकृषिक कजाप ६, आकारबंद ५, मालमत्ता पत्रक ३, नकाशे ६ ग्रामस्थांना देण्यात आले. यावेळी तुकडे सुधारणा दस्त नोंदणी बाबत मार्गदर्शन करण्यात आले.
Views: 281












