नागरी आरोग्य केंद्राला वॉटर प्युरीफायर व संगणक संच भेट
भाजप स्थापना दिन व खा. नारायण राणे वाढदिवसानिमित्त उपक्रम
नगरसेवक शुभम पिसे यांचा पुढाकार
चिपळूण : भाजप स्थापना दिन आणि माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्यासह नगराध्यक्ष उमेश सकपाळ, नगरसेवक शुभम पिसे अन्य मान्यवरांच्या हस्ते वडनाका, चिपळूण येथील नागरी आरोग्य केंद्राला वॉटर प्युरीफायर आणि संगणक संच भेट देण्यात आला. चिपळूण नगरपरिषदेतील आरोग्य सभापती शुभम पिसे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला.
या वेळी प्रशांत यादव यांनी आपल्या मनोगतात माजी केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक दमदार, धडाडीचे आणि स्पष्टवक्ते नेते म्हणून ओळखले जातात. सामान्य कार्यकर्त्यांपासून ते मुख्यमंत्रीपदापर्यंतचा त्यांचा प्रवास हा जिद्द, मेहनत आणि नेतृत्वगुणांचा उत्कृष्ट नमुना आहे. कोकणातील जनतेच्या प्रश्नांना त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले आणि विकासाच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. प्रशासनावर पकड, निर्णयक्षमता आणि संकटसमयी धैर्याने उभे राहण्याची त्यांची वृत्ती यामुळे ते एक प्रभावी नेता म्हणून उभे राहिले आहेत, असे यादव यांनी आवर्जून नमूद केले.
या वेळी चिपळूणचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ, आरोग्य सभापती शुभम पिसे, भाजप गटनेते शशिकांत मोदी, महिला बालकल्याण सभापती रसिका देवळेकर, पाणीपुरवठा व जल नि:सारण समितीचे सभापती निहार कोवळे, नगरसेविका वैशाली निमकर, नगरसेविका अंजली कदम, माजी नगरसेवक, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.ज्योती यादव, भाजपचे जिल्हा सरचिटणीस स्वानंद रानडे, कोषाध्यक्ष आशिष खातू, जिल्हा सदस्य स्वाती देवळेकर, शहर मंडल सरचिटणीस सारिका भावे, उपाध्यक्ष जतिन घटे, मधुकर निमकर, प्रीतम इंगवले, विलास चव्हाण, अभिषेक जागुष्ट्ये, अभिषेक साळुंखे, ज्येष्ठ कार्यकर्ते महेश दीक्षित, कुणाल आंबेकर, महेंद्र भालेकर, पूनम काजारे, प्राजक्ता टाकळे, महेश कांबळी, सर्वेश सुर्वे, अमोल तटकरे यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












