चिपळूण नगर परिषदेच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली
चिपळूण : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघातात नुकतेच निधन झाल्याने चिपळूण नगर परिषदेच्या वतीने शुक्रवारी श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नागरी सुविधा केंद्रात आयोजित या कार्यक्रमात दिवंगत अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या वेळी नगराध्यक्ष उमेश सकपाळ, मुख्याधिकारी संजय जाधव, उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर, उपमुख्याधिकारी प्रमोद ठसाळे, मंगेश पेढांबकर, पाणीपुरवठा समिती सभापती निहार कोवळे, बांधकाम समिती सभापती कपिल शिर्के, शिक्षण व क्रीडा समिती सभापती हर्षाली पवार, स्थायी समिती सदस्य उदय जुवळे, विकी नरळकर, अजय भालेकर, योगेश पवार, संजय गोताड यांच्यासह सर्व नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात उद्यान विभागाचे प्रमुख बापूसाहेब साडविलकर यांनी अजित पवार यांच्या कार्याचा आढावा घेत शाब्दिक श्रद्धांजली अर्पण केली. उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून दिवंगत नेत्यास आदरांजली वाहिली












