WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

चिपळूणात उद्या सरपंच आरक्षणाची सोडत


चिपळूणात उद्या सरपंच आरक्षणाची सोडत

इच्छूकांची घालमेल , वर्षभराची मेहनत वाया जाण्याची भिती

 

चिपळूण  ः तालुक्यातील १३० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत गुरूवारी १४ रोजी तहसील कार्यालयात काढण्यात येणार आहे. २०२५ ते २०३० या पाच वर्षाच्या कालावधीसाठी ही आरक्षण सोडत काढण्यात येइल. गतवर्षी काढलेली सोडत रद्द झाली आहे. नव्याने होणाऱ्या आरक्षणात नामाप्र वर्गासाठी ३५ एैवजी ३४ तर खुल्या प्रवर्गासाठी ८९ एैवजी ९० जागा आरक्षीत केल्या जाणार असल्याची माहिती तहसीलदार प्रविण लोकरे यांनी दिली.

तालुक्यातील बहुतांशी ग्रामपंचायतीत सध्या प्रशासकीय कारभार सुरू आहे. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीत निवडणूका न झाल्याने सरपंचाना प्रशासकीय कारभार पाहण्याच्या सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहे. सरपंच प्रशासकीय कारभार करत असले तरी धोरणात्मक निर्णय घेण्यास शासनाने मनाई केली आहे. त्यामुळे नव्याने होणारी कामे रखडलेली आहेत. गतवर्षी सरपंचपदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली होती. मात्र ३० एप्रील २०२६ रोजी शासनाने अधिसूचना काढून सरपंच आरक्षणात बदल केला आहे. नव्या बदलानुसार नामाप्र वर्गाची एक जागा कमी होणार असून खुल्या गटातील एक जागा वाढणार आहे.

गेल्या काही महिन्यापासून मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीत इच्छूकांनी निवडणूकीची तयारी सुरू केली आहे. आरक्षणानुसार तेथील इच्छूक कामाला लागले होते. मात्र नव्याने होणाऱ्या आरक्षणात बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येथील तहसील कार्यालयात १४ रोजी सकाळी ११ वाजता सरपंच आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. याबाबतच्या सूचना तालुक्यातील ग्रामपंचायतींना तसेच महसूल अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.


595
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!