शिवसेना उबाठाकडून शिवश्री प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांचे स्वागत
चिपळूण : श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, चिपळूण यांच्या वतीने आयोजित कै. कमलाकरशेठ चितळे व्याख्यानमालेत प्रसिद्ध व्याख्याते तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते, शिवश्री प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांचे “राष्ट्र पुरुषांचे आदर्श – नव्या पिढीची जबाबदारी” या विषयावर व्याख्यान होते.
या निमित्ताने इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण येथे आगमन झाल्यानंतर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चिपळूण शहराच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले.
यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व आमदार भास्करराव जाधव, तालुका समन्वयक राजू देवळेकर, माजी नगरसेवक तसेच श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चिपळूणचे अध्यक्ष व अर्बन बँक अध्यक्ष मोहन मिरगल, यांच्या समवेत शहर प्रमुख सचिन उर्फ भैया कदम, उपशहर प्रमुख राजन खेडेकर व मनोज पांचाळ, शहर सचिव प्रशांत मुळये, युवा सेना शहर अधिकारी पार्थ जागुष्टे, पंचायत समिती गटनेता व सदस्य गौरव पाटेकर, विभाग प्रमुख संतोष मिरगल, तालुका प्रसिद्धीप्रमुख सचिन चोरगे, माजी विभागप्रमुख जितेंद्र उर्फ बाळा वेस्वीकर आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.












