WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

चिपळुणात कुंभार समाजाचा 28 रोजी जाहीर मेळावा


चिपळुणात कुंभार समाजाचा 28 रोजी जाहीर मेळावा

कोकणातील नवनिर्वाचीत लोकप्रतिनीधींच्या सत्कारासह विविध पुरस्कारांचे वितरण

 

चिपळूण ः चिपळूण तालुका कुंभार समाजाचा जाहीर मेळाव्याचे आयोजन शनिवारी २८ रोजी करण्यात आले आहे. यानिमीत्ताने कुंभार समाजातील नवनिर्वाचीत राजकीय लोकप्रतिनीधींचा गौरव केला जाणार आहे. तसेच कुंभार समाजात विशेष योगदान देणाऱ्या विविध मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानीत केले जाणार आहे. कापसाळ येथील पाटीदार भवन येथे २८ रोजी सकाळी ९ वाजता हा मेळावा आयोजित केला आहे.
चिपळूण तालुका कुंभार समाजाच्या मेळाव्याचे उदघाटन महासंघाचे संस्थापक सतीश दरेकर यांच्याहस्ते होणार असून अध्यक्षस्थान कुंभार समाजाचे प्रदेशाध्यक्ष रमांकात क्षीरसागर भूषवणार आहेत. मेळाव्याच्या निमीत्ताने कोकणातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत विजयी झालेल्या समाजबांधवाचा गौरव केला जाणार आहे.
या मेळाव्यास महिला प्रदेशाध्यक्षा सौ. रसीकाताई खेडेकर, प्रदेश कार्याध्यक्ष महेश सायकर, के.ई.एम. व्हॉस्पीटल मुंबईचे डॉ. सुरेश काळे, प्रदेश कोअर कमिटी अध्यक्ष संजय रईकर, प्रदेश युवाआघाडी अध्यक्ष संदीप पाटील, ज्येष्ठ समाजसेवक आणि उद्योजक सुरेश पालकर यांची प्रमुख उपस्थिती आहे.
मेळाव्यात कुंभार समाजाच्या प्रगतीसाठी विशेष योगदान देणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन यथोचीत सन्मान केला जाणार आहे. यामध्ये सतीश दरेकर यांना समाजरत्न, सुनिल टेरवकर (सहकारभूषण), सुरेश बुरबाडकर ( व्यवसायभूषण), प्रकाश साळवी (समाजरत्न), तुकाराम साळवी ( समाजभूषण), पूनमचंद भावसार (विद्याभूषण) यांचा समावेश आहे. २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते १० दरम्यान पाग सुकाई मंदिर ते पाटीदार भवन दरम्यान पालखी दिंडी, १० ते ११ दरम्यान गोरोबा काकांची महाआरती, दिपप्रज्वलन, स्वागतगीत व संत शिरोमणी गोरोबा काकांच्या जीवनावर आधारीत लघूनाट्य, ११ ते १२ दरम्यान मान्यवरांचे स्वागत, सत्कार व प्रास्ताविक, १२ ते १ दरम्यान कुंभार समाजातील नवनिर्वाचीत लोकप्रतिनींधीचा सन्मान व समाजात योगदान देणाऱ्या मान्यवरांना पुरस्करा वितरण, १ ते २ दरम्यान मान्यवरांचे मनोगत व आभार, २ ते ३ दरम्यान स्नेहभोजन, दुपारी ३ नंतर महिलांसाठी हळदीकुंकू व विशेष भेटवस्तू वाटपाचे आयोजन करण्यात आले आहे. कुंभार समाजबांधवांनी या मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन संत गोरा कुंभार विकास मंडळ, चिपळूण यांनी केले आहे.


595
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!