WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

भयानक…टेम्पो कलंडून लोखंड थेट महामार्गावर


भयानक…टेम्पो कलंडून लोखंड थेट महामार्गावर

सुदैवाने मोठा अनर्थ टळला, दुचाकीस्वार थोडक्यात बचावला

चिपळूण : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गवरील रावतळे–विंध्यवासिनी रस्त्यानजिक आज गुरुवारी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास लोखंडी सामान वाहून नेणारा टेम्पो अचानक कलंडल्याची घटना घडली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित टेम्पोमधील लोखंडी साहित्य गाडीच्या दर्शनी भागाकडून घसरत थेट महामार्गावर पसरले. त्याच वेळी मागून येणारा एक मोटारसायकलस्वार या साहित्याच्या अंगावर पडण्यापासून थोडक्यात बचावला. प्रसंगावधान राखत त्याने वाहन बाजूला घेतल्याने मोठा अनर्थ टळला.

दरम्यान, शाळेची बसही त्या मार्गाने जात होती. रस्त्यावर सांडलेल्या साहित्यामुळे बसचालकाला वाहन वळसा घालून पुढे न्यावे लागले.

स्थानिक नागरिकांनी या महामार्गावरील वारंवार होणाऱ्या अपघातांबाबत नाराजी व्यक्त करत प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “अशा घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना आवश्यक आहेत,” अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!