WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

तहसीलदारांच्या गाडीखाली आत्मदहनाचा इशारा


तहसीलदारांच्या गाडीखाली आत्मदहनाचा इशारा

चिपळूण, ता. १३ ः शिधावाटपाबाबत चिपळूण तहसील कार्यालयाकडे १० मार्च २०२५ पासून अनेकवेळा अर्ज केले. डिसेंबर २०२५ मध्ये पुरवठा निरक्षकांकडे चौकशी हेऊन ५ महिने झाले तरी त्यावर कार्यवाही झालेली नाही. याबाबत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले होते. तहसील कार्यालाकडून त्याचे पालन न झाल्याने तहसीलदारांच्या गाडीखाली आहत्मत्या करण्याचा इशारा मार्गताम्हाणे येथील सिताराम लक्ष्मण घाणेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत केला. मात्र सिताराम घाणेकर यांच्या शिधावाटप अर्जावर चौकशी करून त्यांना सविस्तर लेखी उत्तर दिले असल्याचे तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी सांगितले.

सिताराम घाणेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार, तहसील कार्यालयास १० मार्च २०२५ रोजी शिधावाटपाबाबत अर्ज केला होता. याबाबत हालचाली न झाल्याने जिल्हा पुरवठा निरीक्षक रोहीनी रजपूत यांनी चिपळूणच्या तहसीलदारांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मात्र या आदेशाचे पालन झालेले नाही. येथील पुरवठा अधिकारी व तहसीलदार जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आहेत. याबबात १५ दिवसात कार्यवाही न झाल्यास तहसीलादारांच्या गाडीखाली केव्हाही आत्मदहन करण्याचा इशारा घाणेकर यांनी दिला आहे. तहसील कार्यालयाकडे केलेल्या पत्रव्यवहाराच्या कादपत्रांच्या प्रती घाणेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.


595
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!