WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

समीर काझी यांना महाराष्ट्र समाजरत्न पुरस्कार


समीर काझी यांना महाराष्ट्र समाजरत्न पुरस्कार

चिपळूण, – तालुक्यातील आपत्कालीन संकटात काळात जातधर्म न पाहता दिवसरात्र देवदूत म्हणून धावणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे अल्पसंख्या सेलचे तालुकाध्यक्ष समीर महमद काझी यांना ठाणे येथील युनिर्व्हसल युनिटी फाऊंडेशनचा महाराष्ट्र समाजसेवा रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. ठाणे येथे शनिवारी १३ रोजी सकाळी ११ वाजता या पुस्काराचे वितरण केले जाणार आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अपघात असो वा वैद्कीय मदतीची गरज, जिथे जिथे नागरिकांना मदतीची गरज आहे. तिथे शक्य तेवढी मदत करण्यास समीर काझी यांचा पुढाकार असतो. त्यांच्या या कार्यामुळेच आमदार शेखर निकम यांनी काझी यांच्यावर अल्पसंख्याक सेलच्या तालुकाध्यक्षदाची जबाबादरी सोपवली होती. कामथे ग्रामपंचायतीत काझी यांनी तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून देखील सामाजीक काम केले आहे. याशिवाय चिपळूण तालुका मुस्लिम समाज कार्यकारिणी सदस्य, चिपळूण तालुका सामाजिक सलोखा सदस्य, जमातुल मुस्लिम कामथे अध्यक्ष म्हणून देखील ते कार्यरत आहेत. त्यांच्या या निष्काम सेवाभावी कार्याची दखल घेत ठाणे येथील संस्थेने समाजरत्न पुस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. आमदार शेखर निकम, राजपुरचे आमदार किरण सामंत व प्रसिद्ध उधोजक सचिन पाकळे यांचे ते विश्वासू सहकारी म्हणूनही परिचीत आहेत. समीर काझी यांना पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन केले आहे.

 


595
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!