*मुंबई :* महाराष्ट्रामध्ये पावसाचे पुनरागमन झाले. हवामान विभागाने ३ ऑक्टोबरला मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील एकूण २१ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, पालघर आणि ठाणे येथे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रातील अनेक भागांना जोरदार पावसाने झोडपून काढल्यानंतर काही दिवसांची विश्रांती मिळाली होती. मात्र, आता पुन्हा एकदा हवामानाने करवट बदलली आहे! २ ऑक्टोबरपासून राज्यात पावसाचे पुनरागमन झाले असून, ३ ऑक्टोबर (शुक्रवार) रोजी मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची दाट शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील एकूण २१ जिल्ह्यांना या पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी आणि विशेषतः शेतकऱ्यांनी योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे.












