पेठमाप येथे उद्यापासून भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा
चिपळूण : जयभीम विकास मंडळ, पेठमाप बौद्धवाडी यांच्या वतीने भव्य ओव्हरआर्म टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा उद्या रविवार दिनांक १ ते सोमवार २ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत उत्साहात पार पडणार आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन नगर पालिकेचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या हस्ते तर उपनगराध्यक्षा रुपाली दांडेकर व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत रविवार दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. तसेच, स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सोमवार दि. २ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता संपन्न होणार आहे. या समारंभास नागरिकांनी, खेळप्रेमींनी तसेच मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक जयभीम विकास मंडळाकडून करण्यात आले आहे. या स्पर्धेमुळे परिसरातील युवकांना खेळाची संधी मिळणार असून क्रीडाविषयक वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे.











