WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

निसर्गासाठी धावणार चिपळूणकर!


निसर्गासाठी धावणार चिपळूणकर!

🟢 भोम येथे उद्या तालुकास्तरीय मिनी मॅरेथॅान स्पर्धा
🟢 ग्रामीण भागात यशवंत शिक्षण संस्थेचा उपक्रम  
🟢 क्रीडा क्षेत्रात चमकण्याची सर्वाना संधी 

चिपळूण : यशवंत शिक्षण संस्था, भोम संचालित महादेवराव शिर्के माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, भोम या विद्यालयात ‘एक धाव निसर्गासाठी, तुमच्या आमच्या आरोग्यासाठी’ या टॅग लाईनने संपन्न होत आहे. यशवंत शिक्षण संस्था, भोम मुख्य मार्गदर्शक आयोजक आहे.  महादेवराव शिर्के माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, भोम व माध्यमिक विद्यालय, दोणवली हे दोन्ही  संयुक्तिक नियोजन करीत आहे.  चिपळूण तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालय यांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

      तालुकास्तरीय स्पर्धा १ फेब्रुवारी, २०२६ रोजी सकाळी ७ वाजता भोम विद्यालयातून सुरु होणार आहेत. १४ वर्षाखालील मुलगे, मुली ४ कि.मी., १७ वर्षाखालील मुलगे मुली ६ कि.मी., खुला गट १८ वर्षापुढील  ८ कि. मी. प्रत्येक गटातून मुलगे, मुली स्वतंत्र बक्षिसे असतील. स्पर्धेत  प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी रोख रक्कम, मेडल  व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते त्याच दिवशी थोड्या वेळेनंतर गौरविण्यात  येईल. सहभागी स्पर्धकास सहभाग प्रमाणपत्र मिळेल. वय वर्ष १४ व १७ वयोगटातील स्पर्धकास विनामुल्य प्रवेश आहे. स्पर्धकाने विहित नमुन्यातील अर्ज वय निश्चिती दाखला अथवा लि. स. जोडून  विद्यालयाच्या मुख्याध्यापक अथवा महाविद्यालयाच्या  प्राचार्याच्या सही शिक्क्याने प्रमाणित केलेला असावा.

खुल्या गटासाठी प्रवेश शुल्क आकारले जाईल.  स्पर्धेची अंतिम नोंदणी दिनांक २८/०१/ २०२६ अखेर सायंकाळी ५ वाजेपर्यंत भोम विद्यालयात होणे आवश्यक आहे. स्पर्धेच्या दिवशी सकाळी ७ नंतर येणाऱ्या स्पर्धकास सहभागी करून घेतले जाणार नाही. स्पर्धेची आयोजक समिती व नियुक्त पंचांचा निर्णय अंतिम राहील. चिपळूण तालुक्यातून जास्तीत जास्त स्पर्धकांनी यात भाग घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९०९६५७५८७६, ८३९०८९६८२४, ८१४९५११६९२, ९९२३८१३७२०, ९८५०९९६५४१, ९२२५३९१२३२, ८२६१८०७११२, ७६२०७४८३८१  यावर संपर्क साधावा. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आपले सहकार्य मिळावे.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!