WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी हेल्पलाईन


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी हेल्पलाईन

लाभार्थी महिलांना दिलासा

एका कॉलवर शंका-तक्रारींचे तात्काळ निरसन

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या शंकांचे व तक्रारींचे तात्काळ निरसन करण्यासाठी 181 हा हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आला आहे, अशी महत्त्वाची घोषणा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली आहे. योजनेशी संबंधित कोणतीही अडचण असल्यास लाडक्या बहिणींनी या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

e-KYC मधील चुका ठरतायत अडचणीचं कारण
योजनेची e-KYC प्रक्रिया करताना काही लाभार्थी महिलांकडून चुकीचा पर्याय निवडला गेल्यामुळे त्यांचा लाभ तात्पुरता स्थगित झाल्याच्या तक्रारी विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. या तसेच इतर सर्व तक्रारी, शंका आणि अडचणींचे फोन कॉलद्वारे निरसन करण्यासाठी 181 महिला हेल्पलाईनवर विशेष मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती मंत्री तटकरे यांनी दिली.

या हेल्पलाईनसाठी कॉल ऑपरेटर्सना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात आले असून, योजनेशी संबंधित सर्व प्रश्नांचे योग्य मार्गदर्शन लाभार्थ्यांना दिले जाणार आहे.

अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी
महाराष्ट्रातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, आरोग्य व पोषण सुधारणा या उद्देशाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी लाभार्थी महिलांना 31 डिसेंबर 2025 पर्यंत e-KYC करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, काही ठिकाणी चुकीच्या नोंदी झाल्याचे निदर्शनास आल्याने, अंगणवाडी सेविकांमार्फत क्षेत्रीय स्तरावर प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

हप्ते विलंबामुळे महिलांचा संताप
दरम्यान, योजनेअंतर्गत नोव्हेंबर व डिसेंबर 2025 चा प्रत्येकी 1500 रुपयांचा हप्ता उशिरा मिळाल्यामुळे विदर्भातील भंडारा, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती व वाशिम जिल्ह्यांत लाडक्या बहिणींनी रस्त्यावर उतरून आक्रोश केल्याचे चित्र पाहायला मिळाले होते.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!