WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

खेर्डीतील ह.भ.प. कृष्णा महाराज फाळके यांचे निधन


खेर्डीतील ह.भ.प. कृष्णा महाराज फाळके यांचे निधन

चिपळूण : खेर्डी गावासह पंचक्रोशीतील वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व असलेले ह.भ.प. कृष्णा महाराज फाळके यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या निधनाने खेर्डी गाव व संपूर्ण पंचक्रोशीमध्ये शोककळा पसरली आहे.

फाळके महाराज हे खेर्डी तसेच पंचक्रोशीतील विविध ठिकाणी वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनसेवा बजावत असत. त्यांच्या ओघवत्या वाणीतील कीर्तनरूपी सेवेमुळे पंचक्रोशीमध्ये त्यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जात होते. याशिवाय त्यांनी महावितरण (वीज वितरण कंपनी) येथे कर्मचारी म्हणून शासकीय सेवा बजावून निवृत्ती घेतली होती. सामाजिक, आध्यात्मिक व शासकीय अशा तिन्ही क्षेत्रांत त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी ८ वाजता खेर्डी–देऊळवाडी येथील स्मशानभूमीत अत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, मुलगा, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!